स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करण्याचे ॲप पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची ८.६२ लाखांची फसवणूक
स्वातंत्र्यदिनाचे डिजिटल शुभेच्छा कार्ड तयार करण्यासाठी मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करणे रत्नागिरीतील एका ज्येष्ठाला भलतेच महागात पडले. सायबर भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून ८ लाख ६२ हजार ४०० रुपयांची रक्कम परस्पर लंपास केली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more‘ऑपरेशन टेप फॉर सेफ’! भाट्ये-पावस मार्गावर अपघातांचे सत्र रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः मैदानात
भाट्ये-पावस मार्गावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे ॲक्शन मोडवर आले आहेत. ‘ऑपरेशन टेप फॉर सेफ’ या विशेष उपक्रमांतर्गत त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून धोकादायक वळणांची पाहणी करत तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.
Read moreजागृत मोटर्सच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण
रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरातील जागृत मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कामावरून काढल्याच्या आणि किमान वेतन न दिल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत नोटीस बजावली आहे.
Read moreअभिमानास्पद! रत्नागिरीचे एसपी नितीन बगाटे देशातील ‘टॉप १००’ पोलीस प्रमुखांच्या यादीत
रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ‘फेम इंडिया’ आणि ‘एशिया पोस्ट’ने जाहीर केलेल्या देशातील सर्वोत्तम १०० पोलीस प्रमुखांच्या मानाच्या यादीत स्थान पटकावले असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
Read moreआंबा घाटात रस्त्याला मोठ्या भेगा; एसटीसह अवजड वाहनांची वाहतूक आजपासून पूर्णपणे बंद
मुसळधार पावसामुळे आंबा घाटात रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घाटातील एसटी आणि अवजड वाहनांची वाहतूक आजपासून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.
Read moreरत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पालीतील ‘श्रद्धा सबुरी’ लॉजवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ‘श्रद्धा सबुरी’ लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलिसांनी छापा टाकत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय नेपाळी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read moreविद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’
रत्नागिरी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व उज्ज्वल भविष्यासाठी ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा समिती आणि भरोसा सेलची विशेष संयुक्त बैठक पार पडली.
Read moreचिपळूणमधील हॉटेलवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश आणि महिलेला अटक
चिपळूण शहरातील एका हॉटेलवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका ३९ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून, मुंबईतील एका २३ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली आहे.
Read moreकारवांचीवाडीत पोहताना बुडून १६ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी शहरालगतच्या कारवांचीवाडी परिसरातील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
Read moreएटीएम कार्ड बदलून रत्नागिरीत महिलेची ५७ हजारांची फसवणूक; सुरतच्या भामट्याविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरीत एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने एका ५८ वर्षीय महिलेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून ५७ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत सुरत येथील एका भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more









