अदानी समूहाला सेबीचा मोठा दिलासा; विनोद अदानींवरील चौकशी अधिकृतपणे बंद

नवी दिल्ली:
शेअर बाजारातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या अदानी समूहाला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून (SEBI) मोठा दिलासा मिळाला आहे. दोन विदेशी पोर्टफोलिओ फंडांमार्फत अदानी समूहातील चार कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीत गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांचा कोणताही सहभाग सिद्ध झालेला नाही, असे सेबीने स्पष्ट केले आहे. या निष्कर्षासह सेबीने ‘किमान सार्वजनिक भागभांडवल’ (Minimum Public Shareholding) नियमांच्या उल्लंघनाबाबत सुरू असलेली आपली चौकशी अधिकृतपणे बंद केली आहे.
सेबीच्या अहवालानुसार, ‘इमर्जिंग इंडिया फोकस फंड’ आणि ‘ईएम रिसर्जेंट फंड’ या परदेशी फंडांच्या गुंतवणूकविषयक निर्णयांमध्ये विनोद अदानींचा कोणताही हस्तक्षेप असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. या फंडांनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. २०२० मध्ये मिळालेल्या तक्रारींच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली होती. २०१३ ते २०१८ दरम्यान या फंडांकडे असलेले शेअर्स प्रत्यक्षात प्रवर्तकांचेच (प्रमोटर्स) होते आणि ते चुकीच्या पद्धतीने सामान्य गुंतवणूकदारांचे म्हणून दाखवण्यात आल्याचा मुख्य आरोप होता. मात्र, केवळ आर्थिक संबंधांवरून एखाद्या व्यक्तीचे कंपनीवर प्रत्यक्ष नियंत्रण सिद्ध होत नाही, असे सेबीने स्पष्ट केले.
याशिवाय, नासेर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग यांच्या माध्यमातून कंपनीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि गुंतवणूकदारांना निधी पुरवल्याचे आरोपही सेबीने फेटाळून लावले आहेत. तरीही तपासात योग्य व पूर्ण माहिती न पुरवल्याप्रकरणी नासेर अली आणि चांग चुंग-लिंग यांच्यावर प्रत्येकी २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात १,९८४ कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा मिळवल्याचा मुख्य आरोपही फंडांवर विनोद अदानींचे नियंत्रण सिद्ध न झाल्यामुळे निकालात निघाला असून, या प्रकरणाशी संबंधित सर्व कायदेशीर प्रक्रिया आता पूर्णपणे समाप्त झाल्या आहेत.

Related Posts

Mr Jones online casino – what to know

Mr Jones online casino – Your Practical UK Guide Who runs Mr Jones online casino and is it safe for UK players? Mr Jones online casino is operated by a…

Read more

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

Mr Jones Casino – Practical Guide for UK Players What makes Mr Jones Casino stand out? When you land on the homepage of Mr Jones Casino, the first thing you’ll…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
error: Content is protected !!