रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर विजेत्या सायकलपटूंची आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
या स्पर्धेत विविध गटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. टाइम ट्रायल प्रकारात १४ वर्षांखालील मुलांच्या गटात चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलचा शिवम आलदर याने प्रथम, तर रत्नागिरीच्या जीजीपीएस शाळेच्या अधिराज कवितके याने द्वितीय क्रमांक पटकावला. याच वयोगटातील मुलींमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलची मृणाल आलदर हिने बाजी मारली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात दापोलीच्या ज्ञानदीप विद्यामंदिरचा आयुष शिंदे प्रथम आणि वरद कदम द्वितीय ठरला, तर चिपळूणच्या आगवेकर विद्यालयाच्या ईशान वझे याने तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची आध्या कवितके हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, १४ वर्षांखालील मुलांच्या ‘मास स्टार्ट’ प्रकारात जीजीपीएसचा रुद्र जाधव आणि खेडच्या एलटीटी इंग्लिश स्कूलचा दिशांत पवार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. याव्यतिरिक्त खेडचा स्वराज राजपूरकर आणि शिवार आंबेरे येथील श्रावणी खानविलकर यांनीही या स्पर्धेत लक्षवेधी सहभाग नोंदवला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे उपाध्यक्ष दर्शन जाधव यांच्यासह अनेक सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विशाल भोसले, प्रसाद देवस्थळी, प्रसाद खेडेकर, विनायक पावसकर, प्रमोद लिंगायत, नारायण पाटोळे, हृषिकेश पुरोहित, अमित पोटफोडे, केदार देवस्थळी, उत्तम पवार, मकरंद पटवर्धन, तसेच चिपळूणचे श्रीनिवास गोखले आणि खेडचे सिद्धेश बांदिवडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. याशिवाय लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचे संस्थाध्यक्ष कमलाकर साळवी आणि सचिव सागर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय प्रशासनाने सर्वतोपरी मदत केली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हा रुग्णालयातर्फे आपत्कालीन स्थितीसाठी रुग्णवाहिका आणि वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे दोन पोलिसही याठिकाणी तैनात करण्यात आले होते.

Related Posts

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

​रत्नागिरी: कथित ‘व्होट चोरी’ प्रकरण आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आक्रमक झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवार, ५…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

  • By admin
  • October 3, 2026
  • 1 views
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल
error: Content is protected !!