शिकार बेतली जीवावर! दाभोळनजीक बंदुकीतून अचानक गोळी सुटून एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

दापोली : ज्योती बिवलकर
तालुक्यातील दाभोळजवळील वणौशी-खोंडारण परिसरात रात्रीच्या वेळी शिकारीसाठी गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. शिकारीदरम्यान गावठी बनावटीच्या बंदुकीतून अनपेक्षितपणे सुटलेल्या गोळीच्या छऱ्यांमुळे सचिन शांताराम शिगवण (वय ४४) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर सोबत असलेले सुनील पांध्ये (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेने संपूर्ण खोंडारण आणि दाभोळ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शिगवण आणि सुनील पांध्ये हे दोघे ३० सप्टेंबरच्या रात्री वणौशी-खोंडारण येथील जंगलात शिकारीसाठी गेले होते. प्राण्यांचा शोध सुरू असतानाच त्यांच्याकडील गावठी बंदुकीतून अनपेक्षितपणे गोळी सुटली. यातील अंदाजे चार ते पाच छर्रे सचिन यांच्या पोटात व पोटाच्या खालच्या भागात खोलवर घुसल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा प्राण गेला. याच वेळी जवळच उभे असलेले सुनील पांध्ये यांच्या मांडीला दोन ते तीन छर्रे लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
​घटनेचे गांभीर्य ओळखून जखमी सुनील पांध्ये यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
​घटनेची माहिती मिळताच दाभोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे ताब्यात घेतले आहेत. हा गोळीबार नेमका कसा झाला, संबंधित शस्त्र कोणाचे होते आणि ते विनापरवाना होते का, या सर्व बाबींचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील जंगलात रात्रीच्या वेळी केली जाणारी बेकायदेशीर शिकार आणि असुरक्षित गावठी शस्त्रांचा धोकादायक वापर या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दाभोळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

Related Posts

संगमेश्वरजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात; तीन जण जखमी, मोठा अनर्थ टळला

संगमेश्वर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या मोठ्या दगडावर आदळून उलटली. या थरारक अपघातात…

Read more

देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
error: Content is protected !!