तुरुंगातून खंडणी मागितल्याप्रकरणी नीलेश घायवळसह सहा आरोपी निर्दोष; पुणे मोक्का न्यायालयाचा मोठा निकाल

​पुणे:
तुरुंगात असताना खंडणी मागितल्याच्या गंभीर आरोपाप्रकरणी पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने (MCOCA Court) नीलेश घायवळसह सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. नीलेश घायवळ सध्या देशाबाहेर असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे. या प्रकरणात नीलेश घायवळसह संतोष धुमाल, मूसा शेख, अक्षय गोगावले, कुणाल कंधारे आणि विपुल माझीरे या सर्व आरोपींना न्यायालयाने बाइज्जत बरी करण्याचे आदेश दिले आहेत.
​हे प्रकरण २०२० मधील असून, नीलेश घायवळ एका अन्य गुन्ह्यात कारागृहात असताना संतोष धुमाल याने तक्रारदाराकडे भावाच्या रॅलीसाठी जीपची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी केला होता. मात्र, त्यानंतर या खटल्यात नाट्यमय वळण आले. तक्रारदाराने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून पोलिसांच्या दबावाखाली ही तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा केला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तक्रारदाराचा जबाब पुन्हा नोंदवला होता. त्या फेरजबाबातही तक्रारदाराने कथित खंडणीच्या घटनेचा पूर्णपणे इन्कार केला होता.
​विशेष मोक्का न्यायालयातील सुनावणीदरम्यान तक्रारदाराने मूळ आरोपांचे खंडन केले, तसेच इतर साक्षीदार आणि पंचांनीही सरकारी पक्षाच्या बाजूला दुजोरा दिला नाही. सबळ पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांचे जबाब लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात नीलेश घायवळच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला, तर अन्य आरोपींसाठी ॲड. रितेश गदादे, ॲड. अनीश पाडेकर, ॲड. बिलाल मणियार आणि ॲड. सलमान पठाण यांनी कामकाज पाहिले. निकालानंतर ॲड. विपुल दुशिंग यांनी या निर्णयाचे स्वागत करत ही निष्पक्ष व सक्षम न्यायव्यवस्थेची पावती असल्याचे नमूद केले.

Related Posts

Mr Jones online casino – what to know

Mr Jones online casino – Your Practical UK Guide Who runs Mr Jones online casino and is it safe for UK players? Mr Jones online casino is operated by a…

Read more

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

Mr Jones Casino – Practical Guide for UK Players What makes Mr Jones Casino stand out? When you land on the homepage of Mr Jones Casino, the first thing you’ll…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
error: Content is protected !!