‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहीम : ७२६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट

नवी मुंबई :

‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले सुमारे २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे ७२६ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई बुधवारी दुपारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रकल्पात नियमांनुसार पूर्ण करण्यात आली. या वेळी सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, पोलीस उपायुक्त अमित काळे, डॉ. रश्मी नांदेडकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या तीन वर्षे नऊ महिन्यांच्या कार्यकाळात नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात ऐतिहासिक कारवाई केली आहे. या कालावधीत पोलिसांनी ३९३ प्रकरणांमध्ये तब्बल १ अब्ज ३९ कोटी ७४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त करून मोठा विक्रम केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत अंमली पदार्थांशी संबंधित २,३८७ गुन्हे नोंदवून ३,२०० संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून १,०७८ किलोग्रॅम मादक पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासोबतच पोलीस दल शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष जनजागृती मोहिमा राबवून तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देत आहे. अंमली पदार्थांचे नेटवर्क मुळापासून उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी ८८२८-११२-११२ (8828-112-112) हा हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक अथवा साठवणुकीबाबतची कोणतीही माहिती नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी शेअर करावी; माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts

कोल्हापूरमध्ये सावकारीचा जाच: ६ लाखांच्या कर्जापोटी उकळले अडीच कोटी, २ वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये खाजगी सावकारांची मुजोरी आणि अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिला अभियंत्याने (इंजिनिअर) ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याच्या बदल्यात तिने सावकाराला तब्बल…

Read more

‘शेतकऱ्यांसाठी तुरुंगात जाण्याचीही तयारी, मंत्र्यांच्या गाड्या अडवू’; पंढरपुरात सुप्रिया सुळेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

पंढरपूर : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पंढरपुरात ‘आक्रोश मोर्चा’ काढला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत शेतकऱ्यांसाठी सरसकट संपूर्ण…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
error: Content is protected !!