भरती परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान होणार; उच्चस्तरीय टास्क फोर्सचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद

मुंबई:
महाराष्ट्रातील स्पर्धा आणि नोकरभरती परीक्षांची प्रणाली अधिक पारदर्शक, विश्वासार्ह व प्रभावी बनवण्यासाठी परीक्षार्थींच्या भावना आणि सूचनांचा सकारात्मक विचार करून ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत या टास्क फोर्सने कोकण विभागातील विद्यार्थ्यांशी आणि परीक्षार्थींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
यापूर्वी टास्क फोर्सने पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथेही विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान आतापर्यंत सुमारे १,५०० विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा झाली असून, ईमेलद्वारे तब्बल ३० हजार सुधारणाविषयक सूचना प्राप्त झाल्या आहेत. या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेतील अनावश्यक विलंब टाळणे, प्रलंबित परीक्षा तातडीने घेणे, ‘एकल नोंदणी व एकल शुल्क’ (वन-टाइम रजिस्ट्रेशन) पद्धत लागू करणे, परीक्षा पद्धतीतील संभाव्य बदलांची पूर्वकल्पना देणे तसेच उत्तरतालिका (आन्सर की) व मूल्यमापन प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवणे यांसारखे महत्त्वाचे मुद्दे मांडले.
विद्यार्थ्यांच्या अडचणींवर बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी स्पष्ट केले की, संघ लोकसेवा आयोग (UPSC) आणि इतर राज्यांमधील यशस्वी भरती प्रक्रियांचा अभ्यास करून व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या जातील. ही समिती केवळ कागदी शिफारशींपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष जमिनीवरील अडचणी सोडवण्यावर लक्ष केंद्रित करेल. या बैठकीस उच्चस्तरीय समितीचे सदस्य तथा माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, यूपीएससीचे माजी सदस्य एअर मार्शल अजित भोसले (निवृत्त), आयआयटी मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.

Related Posts

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई: ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ मालमत्ता जप्त

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात एक मोठी आणि कठोर कारवाई करत ६४६.५८ कोटी रुपयांच्या तब्बल २११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईअंतर्गत ईडीने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्ये…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
error: Content is protected !!