रत्नागिरीतील सर्व ९ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार: ना. उदय सामंत यांची DPC बैठकीत माहिती

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावेत, अशी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकमुखी भूमिका असून, यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकीत दिली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू, असा ठाम निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी गेल्या वर्षीच्या ४०६ कोटी रुपयांच्या आराखड्यात यंदा राज्य शासनाने आणखी २९ कोटी रुपयांची भर घातली असून, समाजकल्याणच्या विकासासाठी ३५ ते ४० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे ना. उदय सामंत यांनी नमूद केले. यासोबतच मागील बैठकीतील मागणीनुसार मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांनी कोकणासाठी महत्त्वपूर्ण असणारी ‘सिंधुरत्न योजना’ सुरू केल्याबद्दल बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस राज्यमंत्री श्री. योगेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे, खासदार श्री. नारायण राणे, खासदार श्री. सुनिल तटकरे, आमदार श्री. भास्कर जाधव, आमदार श्री. किरण (भैय्या) सामंत, आमदार श्री. शेखर निकम, आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार श्री. प्रमोद जठार, आमदार श्री. अनिकेत तटकरे, जिल्ह्याचे पालक सचिव श्री. आप्पासो धुळाज (भाप्रसे), कोकण विभागीय आयुक्त सौ. रुबल अग्रवाल आणि जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Posts

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Conceptualización_avanzada_sobre_el_legado_crusado_y_su_influencia_perdurable

  • By admin
  • October 4, 2026
  • 1 views

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन
error: Content is protected !!