संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे येथे आढळला नर बिबट्याचा कुजलेला मृतदेह

रत्नागिरी : प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे येथील गायकवाडवाडी परिसरात एका नर बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला २८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कुचांबे येथील स्थानिक नागरिक अविनाश भिकाजी टाकळे यांना रस्त्यालगत मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ संगमेश्वर वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी व पंचनामा केला.
​प्राथमिक पाहणीनुसार या नर बिबट्याचा मृत्यू साधारण ९ ते १० दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रदीर्घ कालावधी लोटल्याने मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच कडवई येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली. प्राथमिक तपासणीनुसार बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा, असा निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदवला आहे.
​वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शासकीय नियमावलीनुसार घटनास्थळीच लाकडाची चिता रचून बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले आणि सर्व अवशेष पूर्णपणे नष्ट करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही चिपळूण-रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सूरज तेली, सहयोग कराडे, आकाश कडूकर, कुटगिरीच्या पोलिस पाटील यांच्यासह स्थानिक प्राणीमित्र प्रणित टाकळे आणि शंकर जागुष्टे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Related Posts

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

  • By admin
  • October 3, 2026
  • 1 views
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल
error: Content is protected !!