देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

देवरुख : प्रतिनिधी
सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK) फाईल डाऊनलोड केल्यामुळे साडवली साईनगर येथील २१ वर्षीय कौस्तुभ सोमण या तरुणाचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून ५५ हजार ५९९ रुपये परस्पर लांबवण्यात आले. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात असताना कौस्तुभच्या इन्स्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीकडून एपीके फाईल आली. त्याने ती फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा मोबाईल संशयास्पदरीत्या अचानक चार-पाच वेळा बंद पडला. दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबरला दुपारी सव्वाबाराच्या सुमारास फोन पुन्हा बंद पडला. त्यानंतर काही वेळातच त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याशी लिंक असलेल्या गुगल पेवरून ५५ हजार ५९९ रुपये एका अज्ञात आरोपीच्या युपीआय आयडीवर वळते झाले.
​९ सप्टेंबरला खात्यातील शिल्लक तपासल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कौस्तुभच्या लक्षात आले. याप्रकरणी १ ऑक्टोबरला देवरूख पोलिसांत भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये किंवा संशयास्पद ॲप्स डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

New Hopa Casino account verification guide for UK players

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

PlayGrand UK steps and methods

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

PlayGrand sign in steps and methods – Full UK guide

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

PlayGrand Casino – What UK Players Need to Know

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

PlayGrand Casino Review – Account Verification, Bonuses, Payments & Mobile Guide for UK Players

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Laadukas_atefia_ratkaisu_tarjoaa_kattavat_työkalut_ja_luotettavan_suojan_digita

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views
error: Content is protected !!