व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात ६.५ अब्ज डॉलर्सची महागुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ सोबत सामंजस्य करार
व्हिएतनाममधील ‘विन ग्रुप’ महाराष्ट्रात सुमारे ६.५ अब्ज डॉलर्सची (५४ हजार कोटी रुपये) मोठी गुंतवणूक करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि उद्योग विभागासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि रायगड परिसरातील शाश्वत नागरी विकास, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि हरित ऊर्जेला मोठी चालना मिळणार आहे.
Read more९० हजार कोटींच्या ठेवी मोडून खाताय, पण संयुक्त महाराष्ट्र दालनासाठी पैसे नाहीत का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सवाल
संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ९० हजार कोटींच्या मुदत ठेवी खर्च करण्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. संयुक्त महाराष्ट्र दालनासाठी निधी उपलब्ध नसल्याच्या कारणावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले असून, सरकार केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याचा आरोप केला आहे.
Read moreविशेष संपादकीय – चिपळूण पोलिसांची शरणागती?
चिपळूणमध्ये पत्रकार आणि उपोषणकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणात १५ दिवस उलटूनही पोलीस प्रशासन सुस्त का? पोलिसांची वर्दी गुन्हेगारांसमोर झुकली आहे की पतसंस्थेच्या झगमगाटात त्यांचे डोळे दिपले आहेत? ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांचा पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रहार करणारा विशेष लेख.
Read moreभोंदू बाबा अशोक खरातला ईडीचा दणका; कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल
नाशिकच्या स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. खरातची ७० कोटींची मालमत्ता आणि १३२ संशयास्पद बँक खाती आता तपास यंत्रणांच्या रडारवर असून, या प्रकरणाचे धागेदोरे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराशी जोडले गेले आहेत. वाचा सविस्तर बातमी.
Read moreकंबोज यांच्या लेकीचा शाही वाढदिवस: राज-आदित्य-फडणवीस एकाच मंचावर!
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कन्येच्या शाही वाढदिवसाला देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि चक्क आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली. कट्टर राजकीय विरोधक एकाच छताखाली आल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. पहा या सोहळ्याचे खास फोटो आणि तपशील.
Read moreसावधान! लॉकडाऊनची अफवा पसरवल्यास थेट फौजदारी गुन्हा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा
सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या खोट्या बातम्या आणि मेसेजेस व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंधन टंचाई आणि लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून घाबरून जाऊन साठेबाजी करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Read moreखळबळजनक: मंत्री नरहरी झिरवळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ हनीट्रॅपचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, विरोधकांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
Read moreअशोक खरात प्रकरणावरून विधिमंडळात तुफान गदारोळ; नाना पटोले आक्रमक, देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
महाराष्ट्र विधिमंडळात आज अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरले. आर्थिक फसवणूक आणि शोषणाचे आरोप असलेल्या खरातच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली असून गृहमंत्र्यांनी उद्या अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.
Read moreकोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसानीची दखल घेत, राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदतीची घोषणा करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत ही माहिती दिली असून, प्रशासनाला नुकसानीच्या तीव्रतेनुसार मदतीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read moreखारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन; शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास समाविष्ट करणार – मुख्यमंत्री
नवी मुंबई (प्रतिनिधी): ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती…
Read more













