बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात

ठाणे : प्रतिनिधी

मानपाडा परिसरातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. येथील स्थानिक नगरसेविकेचा जातीचा दाखला बोगस असल्याचा पाठपुरावा पूर्णेकर करत होते. त्यामुळे नगरसेवक पद रद्द होईल, याच भीतीने त्यांचा काटा काढण्यात आला का? असा थेट सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. ‘लोकशाहीचा खून म्हणतात तो हाच आहे,’ असा संतप्त घणाघातही त्यांनी यावेळी केला.
​मनोरमानगर येथील गणेशनगरात दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना भास्कर जाधव यांनी ठाण्यात वाढलेली राजकीय दहशत आणि ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रदीप पूर्णेकर हे मनोरमानगरातील तब्बल १७० एकर जमिनीवर लादल्या जाणाऱ्या मनमानी क्लस्टर योजनेला कडाडून विरोध करत होते आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष करत होते. तसेच, तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी त्यांनी ड्रग्जविरोधी मोहीमही उघडली होती. यासोबतच, स्थानिक नगरसेविकेचे जातप्रमाणपत्र महाराष्ट्राबाहेरचे आणि संशयास्पद असल्याने त्याविरोधात त्यांनी कायदेशीर लढा पुकारला होता. या सर्व प्रश्नांना पुराव्यानिशी आणि कायद्याने उत्तर देण्याऐवजी जर त्यांचा थेट काटाच काढण्यात आला असेल, तर हा सरकारला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे, असे जाधव म्हणाले.
​राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ‘गुन्हेगार पाताळात लपला तरी शोधून काढीन, कोणालाही सोडणार नाही,’ अशा केवळ वल्गना केल्या जातात; मात्र मुख्यमंत्र्यांकडे गेली दहा वर्षे गृहखाते राहूनही राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नाही आणि पोलिसांचा दरारा पूर्णपणे संपला आहे, अशी बोचरी टीका जाधव यांनी केली.
​या श्रद्धांजली सभेला शिवसेना नेते राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिश गाढवे यांच्यासह दिवंगत पूर्णेकर यांच्या पत्नी वैजयंती, मुलगा राम, भाऊ जयनाथ आणि परिसरातील अनेक नागरिक, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी

ठाणे: मानपाडा परिसरातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागले आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात नीलेश पवार याने पूर्णेकरांवर…

Read more

राज ठाकरेंची डरकाळी: ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; ‘SIR’ प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी

मुंबई: मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मुद्द्यावर आज…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकरच्या तन्वी मोरेला शास्त्रीय गायनात रौप्यपदक!

बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात

  • By admin
  • October 5, 2026
  • 3 views
बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात

राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
राज्यातून मान्सूनच्या परतीला वेग; पावसाची उघडीप मिळताच ‘ऑक्टोबर हिट’च्या चटक्याने नागरिक हैराण

बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views
बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी

नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध
error: Content is protected !!