दापोलीत जि. प. शाळांची दमदार कामगिरी; ८७ गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

दापोली : ज्योती बिवलकर
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे व अस्सल असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत आई-वडिलांपेक्षाही गुरूंची छाया अधिक प्रभावी ठरते. आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा खासगी शाळांपेक्षाही अधिक दर्जेदार व उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांनी काढले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा दापोलीच्या वतीने आयोजित भव्य गुणगौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात तालुक्यातील ८७ यशवंत व गुणवंत विद्यार्थी, उपक्रमशील शाळा, आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त तसेच नवनियुक्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
​पंचायत समितीच्या उपसभापती नम्रता तोडणकर यांनी जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीची प्रशंसा करत पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष देण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात प्रवीण काटकर यांनी शिक्षकांच्या हक्कांसोबतच संघटना सामाजिक भान जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
​या सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर गोळांबडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, संदीप चिखले, श्रीराम इदाते, नरेश घरटकर, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, अनिल सुकाळे, गणेश पवार, सर्व केंद्रप्रमुख आणि चारशेहून अधिक शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुस्वर स्वागतगीत सादर करण्यात आले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी केले, तर सूत्रसंचालन वैभव बोरकर व अनुराधा देसाई यांनी केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Posts

फळबागायतदारांना हवामान आधारित विमा कवच !

आंबा, काजू, नारळ आणि सुपारी उत्पादकांना मोठा दिलासा रत्नागिरी : प्रतिनिधी बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे नुकसान लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२६-२७ या…

Read more

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी : प्रतिनिधी अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची अत्यंत सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Valore_e_riflessi_nel_gioco_chickenroad_sfida_lattraversamento_pieno_di_pericoli

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Effectieve_planning_en_https_zombillion-netherlands_nl_voor_optimale_financiële

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Fascinerende_kansen_biedt_zombillion_casino_voor_de_serieuze_speler_vandaag

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Strategy_and_benefits_of_playing_at_a_non_uk_registered_casino_offer_distinct_fl

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Emocjonująca_rozgrywka_i_świetne_szanse_z_magneticslots_w_nowoczesnych_kasynac

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Élégantes_opportunités_ludiques_avec_betify_casino_et_gains_exceptionnels_gar

  • By admin
  • October 6, 2026
  • 3 views
error: Content is protected !!