अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी : प्रतिनिधी
अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची अत्यंत सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रशासनाला प्रलंबित प्रकरणे वेळेत मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या, तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट आठवडाभरात पूर्ण करण्याचे आवाहनही केले.
​या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा आणि प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारींची वेळेत पडताळणी करून सर्व विभागांनी आपली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबतच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत एका बिल्डरविरोधात दाखल असलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत, त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले.
​या बैठकीदरम्यान सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचाही विशेष आढावा घेण्यात आला. सीमेवर देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन ही आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची संधी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व शासकीय विभागांनी येत्या आठवडाभरात आपले दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून हा निधी जमा करावा आणि देशासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जिंदल यांनी केले आहे.
​या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव आणि सागर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

Related Posts

फळबागायतदारांना हवामान आधारित विमा कवच !

आंबा, काजू, नारळ आणि सुपारी उत्पादकांना मोठा दिलासा रत्नागिरी : प्रतिनिधी बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे नुकसान लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२६-२७ या…

Read more

रत्नागिरीत काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधात मूकमोर्चा; ईव्हीएम बंद करण्याची आणि मुख्य आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

रत्नागिरी : प्रतिनिधी संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मूकमोर्चा काढण्यात आला. ईव्हीएम आणि…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Valore_e_riflessi_nel_gioco_chickenroad_sfida_lattraversamento_pieno_di_pericoli

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Effectieve_planning_en_https_zombillion-netherlands_nl_voor_optimale_financiële

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Fascinerende_kansen_biedt_zombillion_casino_voor_de_serieuze_speler_vandaag

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Strategy_and_benefits_of_playing_at_a_non_uk_registered_casino_offer_distinct_fl

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Emocjonująca_rozgrywka_i_świetne_szanse_z_magneticslots_w_nowoczesnych_kasynac

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Élégantes_opportunités_ludiques_avec_betify_casino_et_gains_exceptionnels_gar

  • By admin
  • October 6, 2026
  • 3 views
error: Content is protected !!