रत्नागिरी: दुचाकीच्या पैशांवरून वाद; तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला, एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरीतील कोकणनगर परिसरात दुचाकी खरेदीसाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read more

पोलिसांच्या ‘मिशन जलद’चा फुगा फुटला?

“हजारो अर्ज आणि शून्य प्रलंबित” असा दावा करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांची कार्यक्षमता संशयाच्या भोऱ्यात! उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या सायबर तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांचा दावा फोल ठरल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

Read more

रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; विविध गुन्ह्यांत जप्त केलेला ९० लाखांचा ड्रग्ज साठा जाळून नष्ट

रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ माफियांविरोधात मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांत जप्त केलेला सुमारे ९० लाख रुपये किमतीचा ड्रग्जचा साठा तळोजा येथे जाळून नष्ट केला आहे. एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत २०१९ ते २०२६ दरम्यान दाखल ११ गुन्ह्यांमधील २० किलोहून अधिक प्रतिबंधित पदार्थ (गांजा, चरस, कोकेन) वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करण्यात आले असून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

Read more

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर बुडण्याच्या दुर्घटना रोखण्यासाठी उभारणार ‘रोबोटिक वॉटर पार्क’; रत्नागिरी पोलीस अधीक्षकांचा मोठा पुढाकार

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर बुडण्याच्या दुर्घटना रोखण्यासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ‘रोबोटिक वॉटर पार्क’ उभारण्याचा अभिनव प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. पाच तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हायटेक सागरी सुरक्षेसाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन आणि पाण्यातून काम करणाऱ्या रोबोटिक उपकरणांद्वारे पर्यटकांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जाईल.

Read more

रत्नागिरीत गोवंशीय मांसाची बेकायदेशीर वाहतूक व साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेकडून एकाला अटक

रत्नागिरीतील उद्यमनगर परिसरात विनापरवाना गोवंशीय मांसाची बेकायदेशीर वाहतूक आणि साठा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत लियाकत शौकत दावत याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५१ किलो ५०० ग्रॅम गोवंशीय मांस, दुचाकी आणि डीप फ्रीझर असा एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात पत्रकार आक्रमक; गुन्हा दाखल करण्यासाठी रत्नागिरीत पोलीस अधीक्षकांना निवेदन

पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात ‘मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी’ आक्रमक झाली आहे. खासदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नीतीन बगाटे यांना निवेदन दिले. याप्रकरणी योग्य ती शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.

Read more

खेडशीत भीषण अपघात; भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले, जाकादेवीतील महिलेचा जागीच मृत्यू

रत्नागिरीनजीकच्या खेडशी येथे डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीवरील जाकादेवी येथील एका महिलेचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपर रस्त्याशेजारील चरात कोसळला असून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Read more

गणपतीपुळ्यात समुद्रस्नानासाठी उतरलेले छत्रपती संभाजीनगरचे ५ पर्यटक बुडाले; एकाचा मृतदेह हाती, चौघांचा शोध सुरू

रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे समुद्रस्नानासाठी उतरलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५ तरुण पर्यटक समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील एकाचा मृतदेह हाती लागला असून, तटरक्षक दल, पोलीस आणि स्थानिक जीवरक्षकांकडून इतर ४ जणांचा शोध घेतला जात आहे.

Read more

जयगड जेएसडब्ल्यू पोर्टवर सुरक्षा वाऱ्यावर; बिहारच्या कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून पडून मृत्यू

रत्नागिरी येथील जयगड जेएसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून पडून बिहारच्या एका ३७ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि कंपनी प्रशासनाचा हलगर्जीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Read more

रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी “मरीन होमगार्ड” सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी “मरीन होमगार्ड” विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांना आपत्कालीन बचावकार्य आणि नौकानयनाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

Read more

error: Content is protected !!