सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र? विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने महाराष्ट्रात नवा वाद
नागपूर : महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणखी एका मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असताना, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण…
Read more‘लाडकी बहीण’ योजनेत ३५१५ कोटींचा कथित घोटाळा; संजय राऊत यांच्या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले
‘लाडकी बहीण’ योजनेत ३५१५ कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी शिंदे आणि अजित पवार गटावर टीका करत शरद पवार यांची पाठराखण केली आहे.
Read moreगद्दारांच्या छातीवर पाय ठेवून पुन्हा सत्तेत येणार; यवतमाळच्या सभेत संजय राऊत कडाडले
यवतमाळ येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “निष्ठावान शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना आजही भक्कम उभी असून, गद्दारांच्या छातीवर पाय ठेवून पुन्हा सत्तेत येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीत जाऊन लाचारी पत्करणाऱ्या या गद्दारांना जनता आगामी निवडणुकीत धडा शिकवेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
Read moreअटी-शर्तींचा विळखा नको, संपूर्ण कर्जमुक्ती द्या! फसव्या कर्जमाफीविरोधात मविआचे विधानभवनावर जोरदार आंदोलन
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारच्या फसव्या कर्जमाफी योजनेविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. “नको अटी, नको शर्ती, शेतकऱ्यांना हवी कर्जमुक्ती” अशा घोषणा देत आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
Read more“बाळ माने आम्हाला परके नाहीत”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने कोकणच्या राजकारणात खळबळ
कोकण विधान परिषद निवडणुकीत नाट्यमयरीत्या अर्ज मागे घेत महायुतीचा मार्ग मोकळा करणारे बाळ माने यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मोठे वक्तव्य केले आहे. “बाळ माने आम्हाला परके नाहीत,” असे फडणवीसांनी स्पष्ट केल्यामुळे आता माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असून कोकणात नव्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत.
Read moreऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई; बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी!
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीची कोंडी करणाऱ्या बाळ माने यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, या नाट्यमय घडामोडींमुळे कोकणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
Read moreयेत्या दीड महिन्यात पेट्रोल १७० आणि डिझेल १५० रुपये होईल; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर तीखा हल्ला
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात इंधन दरवाढीवरून सरकारवर तीव्र टीका केली असून आगामी काळात पेट्रोल १७० आणि डिझेल १५० रुपयांवर पोहोचण्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर राज्याची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप केला.
Read moreमविआ विधान परिषदेच्या सर्व १७ जागांवर लढणार निवडणूक; महायुतीच्या अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्याचा महाविकास आघाडीचा संकल्प
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (मविआ) सर्व १७ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत नाराजीचा फायदा उठवण्यासाठी मविआने हे पाऊल उचलले असून, पक्षांच्या स्थानिक ताकदीनुसार येत्या दोन दिवसांत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे.
Read moreमहाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रखडलेल्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर; १८ जूनला मतदान, २२ जूनला निकाल!
महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून, या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे.
Read moreमहाविकास आघाडीत खळबळ! अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी; उद्या अर्ज दाखल करणार
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, दानवे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. मात्र, या निर्णयामुळे काँग्रेस नाराज असल्याची चर्चा असून महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read more









