लांजातील काजू फॅक्टरीतील मोठ्या चोरीचा पर्दाफाश; ४०० किलोहून अधिक काजू जप्त, २ आरोपींना बेड्या
लांजा येथील प्रसिद्ध ‘झिमन्स काजू फॅक्टरी’मधील मोठ्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत पोलिसांनी बनावट ग्राहक बनून सापळा रचला आणि दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून ४०० किलोहून अधिक सुके काजू जप्त करण्यात आले असून त्यांनी तब्बल ९०० किलो काजू चोरीची कबुली दिली आहे.
Read moreरत्नागिरीचे माजी अपर पोलीस अधीक्षक आणि ‘SRPF’ कमांडंट तुषार पाटील यांचे पुण्यात अकाली निधन; पोलीस दलात हळहळ
राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) दौंड येथील समादेशक (कमांडंट) आणि रत्नागिरीचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (वय ४५) यांचे रविवारी (७ जून) पुण्यात उपचारादरम्यान अकाली निधन झाले. सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांचे किडनी प्रत्यारोपण झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्र पोलीस दलात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Read moreरत्नागिरी पोलिसांची गुन्हे तपासात प्रभावी कामगिरी; प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी राखण्यात यश
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गुन्हे तपासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वर्षभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९२ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्ह्यांचा यशस्वी तपास पूर्ण करून पोलिसांनी प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत कमी राखण्यात यश मिळविले आहे.
Read moreसुरज झोरे हत्याकांड: मुख्य आरोपीची मैत्रीण पोलिसांसमोर हजर, तपासाला वेग
रत्नागिरीतील खळबळजनक सुरज झोरे हत्याकांडात एक मोठी घडामोड समोर आली असून, या गुन्ह्याची मुख्य प्रत्यक्षदर्शी आणि संशयित आरोपीची मैत्रीण अखेर मुंबईतून पोलिसांसमोर हजर झाली आहे. पोलिसांनी तिला थेट घटनास्थळी नेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जुना आर्थिक वाद आणि मैत्रिणीला भडकवल्याच्या रागातून हा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
Read moreकुवारबाव रक्तरंजित थरार! ४० कोयता वारांनी तरुणाचा निर्घृण खून; मृत्यूपूर्वीच सांगितली आरोपींची नावे, खून करण्यामागील कारण काय?
रत्नागिरीजवळील कुवारबाव-साईनगर परिसरात पूर्ववैमनस्य आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून सुरज झोरे (२५) या तरुणावर कोयत्याने ३५ ते ४० वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. गंभीर जखमी सुरजने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण रत्नागिरी परिसरात खळबळ उडाली आहे.
Read moreगोव्यात अपघात करून पळ काढणारा कंटेनर रत्नागिरीत जेरबंद; चालकासह वाहन गोवा पोलिसांच्या ताब्यात
गोव्यातील पत्रादेवी येथे अपघात करून मुंबईच्या दिशेने फरार झालेला मालवाहू कंटेनर रत्नागिरी पोलिसांनी कुवे गावाजवळ महामार्गावर पाठलाग करून पकडला. रत्नागिरी पोलिसांनी चालक आणि वाहनाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
Read moreरत्नागिरीत शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बॉम्बचा भीषण स्फोट; महिला गंभीर जखमी, ५ बोटे तुटली!
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी गावात शिकारीसाठी लपवून ठेवलेल्या गावठी बॉम्बचा भीषण स्फोट झाला. कुंपणासाठी बांबू गोळा करणाऱ्या एका ४७ वर्षीय महिलेचा हात या बॉम्बला लागल्याने झालेल्या स्फोटात तिच्या डाव्या हाताची पाचही बोटे तुटली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Read moreरत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात ‘बेल्जियन मालिनॉइस’ जातीचा श्वान दाखल
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात अत्यंत हुशार आणि चपळ समजल्या जाणाऱ्या ‘बेल्जियन मालिनॉइस’ जातीचा श्वान दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते या श्वानाचे ‘लिओ’ असे नामकरण करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांची ताकद आणखी वाढणार आहे.
Read moreराजापुरात खळबळ: सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी २० हजारांची लाच घेताना दोन महिला अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
राजापूर तालुक्यातील मौजे जवळतेथर येथील सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव लावण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोतवाल संजना माने आणि मंडळ अधिकारी पूनम गावीत या दोन महिला अधिकाऱ्यांना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली असून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read moreरत्नागिरीत अवैध दारूविक्री विरोधात मद्य परवानाधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण
जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध आणि बनावट दारू विक्रीविरोधात मद्य परवानाधारकांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र ताशेरे ओढण्यात आले आहेत. “कर भरणारे रस्त्यावर आणि अवैध धंदेवाले मोकाट” असा सवाल करत, जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
Read more









