सिंहस्थ कुंभमेळा २०२७: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या ‘बोधचिन्हा’चे दिमाखदार अनावरण
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अधिकृत बोधचिन्हाचे (Logo) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत अनावरण करण्यात आले. हा सोहळा राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वाची संधी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Read moreराज्यातील ५,४५९ पोलिसांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; मुख्यमंत्री फडणवीसांकडून १७६८.०८ कोटींच्या निधीला मंजुरी
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील ५,४५९ कर्मचाऱ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरबांधणी अग्रीमसाठी १७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच बंद पडलेली ‘व्याजसवलत अनुदान योजना’ पुन्हा सुरू करून पोलीस कल्याणासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
Read moreजागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘सीआयआय’ परिषदेत ग्वाही
नवी दिल्लीतील ‘सीआयआय’ बिझनेस समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक सज्जतेचा रोडमॅप मांडला. पायाभूत सुविधा आणि विश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यास सज्ज असून २०४७ च्या विकसित भारताच्या स्वप्नात राज्याचा वाटा महत्त्वपूर्ण असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Read moreनागपूर: फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात आलेल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सिंधी समाजाला हक्काचे घर आणि जमीन मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधी बांधवांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाजातील ३६ नगरसेवकांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या सिंधी समाजाने अनेक वर्षे शिबिरांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घालवली. मात्र या समाजाने आपल्या दुःखालाच संघर्षाचे शस्त्र बनवले आणि आज हा समाज व्यापार आणि सर्वच क्षेत्रांत आघाडीवर राहून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे अभियान राबवले गेले असून, राज्य सरकारने आता या बांधवांना वर्ग-१ च्या जमिनींचे शंभर टक्के मालकी हक्क देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी अत्यंत वेगाने केली जाईल. कार्यक्रमात ३५० पैकी १२ लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी जमिनींचे नियमितीकरण करण्याबाबत वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे महत्त्वाचे आश्वासन दिले. या सोहळ्याला भगवानदास सवनानी, आमदार कुमार आयलानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय संरक्षक घनश्याम कुकरेजा, सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनकी रूघवानी, संयोजक वीरेंद्र कुकरेजा आणि सचिव पी.टी. दारा यांसह समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
नागपूरच्या जरीपटका येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंधी बांधवांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजाने शून्यातून प्रगती करत देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी यावेळी ३६ नगरसेवकांचा सत्कार केला आणि उल्हासनगरसाठीही लवकरच नियमितीकरणाचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.
Read moreटीसीएस नाशिक प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी टीसीएस नाशिक प्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा अहवाल तयार केला असून यात महिला सुरक्षेबाबत महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत.
Read moreअंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे लोकार्पण; मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री शिंदे यांची उपस्थिती
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात नूतनीकरण केलेल्या अत्याधुनिक पोस्ट ऑफिसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. पोस्ट विभागाने बँकिंग आणि आधार सेवांच्या माध्यमातून लोकांचा मोठा विश्वास संपादन केला असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
Read moreमुंबईतील जे.जे. रुग्णालयात आता हाय-डेफिनिशन ब्रॉन्कोस्कोपी सुविधा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
इंडियन ऑइलच्या सीएसआर निधीतून मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयाला अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग आणि क्षयरोगासारख्या गंभीर आजारांचे जलद व अचूक निदान सरकारी रुग्णालयातच मोफत किंवा माफक दरात होणे शक्य होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
Read moreजलयुक्त शिवार २.० ची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
एल निनोच्या संकटामुळे भूजल पातळी वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार २.० ची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. १५ मे पूर्वी आराखडे मंजूर करण्यासोबतच विदर्भातील मालगुजारी तलावांची दुरुस्ती जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी मृद व जलसंधारण विभागाला दिल्या आहेत.
Read moreमुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘वॉटर मेट्रो’चा उतारा; महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या कंपनीत महत्त्वपूर्ण करार
मुंबईत पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या हायके एएस कंपनीत करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रकल्प मार्गी लागला.
Read moreव्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लॅम यांचे मुंबईत आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून जंगी स्वागत
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लॅम यांचे मुंबईत आगमन झाले असून राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात ते एनएसईला भेट देणार आहेत.
Read more














