महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी केंद्र-राज्य कटिबद्ध; जलसंधारण प्रकल्पांना गती देणार

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारचे जलजीवन मिशन आणि राज्यातील जलसंधारण योजनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत दिली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी या मोहिमेला गती देण्यासाठी निधी देण्याचे मान्य करत महाराष्ट्राच्या ‘जलतारा’ योजनेचे कौतुक केले.

Read more

मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; राज्यातील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर गृह आणि पुरवठा विभागाला कठोर कारवाईचे आदेश

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साठेबाजांना कठोर इशारा दिला आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे नागरिकांनी केलेल्या अतिरिक्त खरेदीमुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, खरीप हंगामात शेतकऱ्यांना डिझेलचा तुटवडा भासू नये यासाठी गृह आणि पुरवठा विभागाला संयुक्तपणे कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

Read more

पुण्यात ४०० कोटींची गुंतवणूक आणि १००० नव्या नोकऱ्या! राज्य शासन आणि ‘अग्रेको इंडिया’ कंपनीत महत्त्वाचा करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि ‘अग्रेको इंडिया’ कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे पुण्यात पुढील १० वर्षांत सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून १ हजारांहून अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत.

Read more

मुंबईच्या केईएम रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपकरणे दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे गरीब रुग्णांना मिळणार दर्जेदार उपचार

मुंबईच्या केईएम रुग्णालयात ‘सीएसआर’ अंतर्गत अत्याधुनिक इलेक्ट्रोसर्जिकल उपकरणे दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विशेष पुढाकारामुळे आता गरीब आणि गरजू रुग्णांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत किंवा अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत.

Read more

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता, शांततेचे आवाहन

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे खळबळ उडाली असून, या अचानक निर्माण झालेल्या तुटवड्यामागे घातपाताची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नये, असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आरसी बुक पाहून गरजेनुसार डिझेल पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Read more

अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र जागतिक केंद्र बनणार; अमेरिकन कंपन्यांना गुंतवणुकीचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

‘यूएस न्यूक्लिअर एक्झिक्यूटिव्ह मिशन इन इंडिया’ अंतर्गत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकन कंपन्यांना महाराष्ट्रात अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भविष्यातील औद्योगिक प्रगती आणि अखंड विजेसाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची असून, महाराष्ट्र या क्षेत्राचे जागतिक निर्यात केंद्र बनण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याकडून गुंतवणूकदार कंपन्यांना जमीन, पायाभूत सुविधा आणि विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.

Read more

ओबीसी नॉन-क्रिमी लेयर मर्यादा १५ लाखांवर; उपसमितीची मोठी शिफारस!

महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने नॉन-क्रिमी लेयरची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांवरून १५ लाख रुपये करण्याची मोठी शिफारस केली आहे. यासोबतच राज्यातील ४३ जातींचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यास मंजुरी देण्यात आली असून, जात प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

Read more

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय: ६.५ लाख कोटींची गुंतवणूक, २५ हजार मेगावॅटहून अधिक अणुऊर्जा निर्मिती आणि १.२३ लाख रोजगारांची संधी!

महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रात ६.५ लाख कोटींची ऐतिहासिक महागुंतवणूक! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४ बड्या कंपन्यांसोबत करार; २५,४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीसह १.२३ लाख नव्या रोजगारांची होणार निर्मिती.

Read more

विदर्भात धावणार विकासाचा वेग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ५१,९०६ कोटींच्या ४ मोठ्या एक्सप्रेसवे प्रकल्पांना मंजुरी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विदर्भातील ५४७ किमी लांबीच्या ४ मोठ्या एक्सप्रेसवे प्रकल्पांना ५१,९०६ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि सुरजागड ग्रीनफिल्ड रस्त्याचा समावेश असून यामुळे विदर्भातील व्यापार आणि दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.

Read more

नवनिर्वाचित १० विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न; सभापती राम शिंदे यांनी दिली शपथ

विधान भवन मुंबई येथे १० नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे यांच्यासह १० सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. या प्रसंगी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

Read more

error: Content is protected !!