१४ ऑगस्टला मंत्रालयाच्या खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश; सर्व विभागप्रमुखांना फर्मान

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून १४ ऑगस्ट रोजी मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनाच्या सर्व खिडक्या बंद ठेवण्याचे विशेष आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मंत्रालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून वाहनांनाही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Read more

धीरज परदेशी हत्याकांड, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तणाव निवळला

अहिल्यानगरमधील मुकुंदनगर येथे झालेल्या धीरज परदेशी हत्याकांडावरून शहरात निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आणि आरोपींच्या अवैध अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. याप्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Read more

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज देणार – मुख्यमंत्री फडणवीस

राज्यातील शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली आहे. यंदाच्या वर्षाअखेर ९० टक्के, तर पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील शेतकरी मेळाव्यात केली.

Read more

मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात; ‘डबल गेम’ खेळत असल्याचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘डबल गेम’ खेळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिंदेंच्या सांगण्यावरूनच आपल्याविरोधात कट रचला जात असून, त्यांनीच ओबीसी नेत्यांना मराठ्यांच्या अंगावर सोडल्याचा घणाघात जरांगे यांनी केला आहे.

Read more

मुंबईत ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांची नशामुक्तीची हाक

मुंबईला व्यसनमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. येत्या २ ते ४ वर्षांत मुंबई ड्रग्जमुक्त करण्याचे ध्येय असून माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Read more

नीट परीक्षा आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश

नीट परीक्षा आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे आंदोलक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या करिअरला मोठा दिलासा मिळाला आहे.

Read more

“दिल्लीत मोठं चक्रिवादळ आहे, उठसुट फेऱ्या मारू नका”; संजय राऊतांचा महायुती नेत्यांना टोला

मंत्र्यांच्या सुरक्षेत केलेली वाढ आणि दिल्लीच्या फेऱ्यांवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती नेत्यांवर खोचक शब्दांत निशाणा साधत टोला लगावला आहे.

Read more

टीईटी घोटाळा फडणवीसांच्याच काळात; ठाकरे सरकारने तो उघडकीस आणला – सुषमा अंधारे

टीईटी घोटाळा ठाकरे सरकारच्या काळातला नसून तो उघडकीस आणून गुन्हेगारांना तुरुंगात टाकले होते, असे स्पष्ट करत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात आषाढीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण होणार

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. तसेच पंढरपूर कॉरिडॉरचे काम अडीच वर्षांत पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Read more

विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली; विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या मुंबईतील पोलिसाची बदली करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली.

Read more

error: Content is protected !!