मंत्रिमंडळात फक्त ४ महिला; मग आरक्षणाची भाषा कशाला? अंजली दमानियांचा देवेंद्र फडणवीसांवर प्रहार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ३९ पैकी केवळ ४ महिला मंत्री असताना आरक्षणाच्या गप्पा कशाला? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आकडेवारीनिशी जोरदार प्रहार केला आहे. ‘आधी ३३ टक्के महिला मंत्री करा, मग बँड वाजवून डान्स करू’ अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.

Read more

संजय राऊत मानहानी प्रकरण: भाजप नेते नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट जारी

खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी माझगाव न्यायालयाने भाजप नेते नितेश राणे यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. सलग दोन सुनावणीला गैरहजर राहिल्याने कोर्टाने ही कारवाई केली.

Read more

‘हसताय काय? हलक्यात घेऊ नका!’; प्रियांका गांधींनी मोदी सरकारला भर संसदेत सुनावले; महिला आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले!

महिलांना बहकावणाऱ्या पुरुषांना स्त्रिया झटक्यात ओळखतात, सावध राहा!” महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षणाच्या अंमलबजावणीतील विलंब आणि ओबीसी कोट्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले असून, “हसताय काय? हलक्यात घेऊ नका!” अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांना सुनावले. या आक्रमक भाषणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Read more

विरोधी पक्षांचे अस्तित्व संपवण्यासाठी भाजपला हवी तशी मतदारसंघांची पुनर्रचना; संजय राऊत यांचा प्रहार

भाजपने मतदारसंघांची पुनर्रचना आपल्या सोयीनुसार करण्याचे कारस्थान रचले असून, विरोधी पक्षांचे अस्तित्व संपवण्याचा हा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचा घणाघात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूक आयोग भाजपच्या ताटाखालचे मांजर झाल्याची टीका करत त्यांनी याविरोधात सर्वपक्षीय लढ्याचे संकेत दिले आहेत.

Read more

चंद्रशेखर बावनकुळे यांची रविराज साबळे यांना २५ कोटींची मानहानीची नोटीस

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे यांना २५ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर जमीन व्यवहाराचे आरोप केल्याप्रकरणी बावनकुळे यांनी ही कायदेशीर कारवाई केली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Read more

विशेष संपादकीय – चिपळूण पोलिसांची शरणागती?

चिपळूणमध्ये पत्रकार आणि उपोषणकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणात १५ दिवस उलटूनही पोलीस प्रशासन सुस्त का? पोलिसांची वर्दी गुन्हेगारांसमोर झुकली आहे की पतसंस्थेच्या झगमगाटात त्यांचे डोळे दिपले आहेत? ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांचा पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रहार करणारा विशेष लेख.

Read more

खेडमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

खेडमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान ‘इन्फिगो आय केअर हॉस्पिटल’च्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शिबिराचे ठिकाण, वेळ आणि संपर्क क्रमांकाची सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read more

कंबोज यांच्या लेकीचा शाही वाढदिवस: राज-आदित्य-फडणवीस एकाच मंचावर!

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या कन्येच्या शाही वाढदिवसाला देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि चक्क आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली. कट्टर राजकीय विरोधक एकाच छताखाली आल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. पहा या सोहळ्याचे खास फोटो आणि तपशील.

Read more

साताऱ्यात लोकशाहीची हत्या! जिल्हा परिषद निवडीवरून महायुतीत मोठा भडका; सुप्रिया सुळे आक्रमक

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून महायुतीत मोठा संघर्ष निर्माण झाला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर करत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुकीमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत.

Read more

वसई-विरार महापालिकेत लोकशाहीचा मुडदा! भाजप आणि बविआ नगरसेवकांमध्ये जोरदार राडा; धक्काबुक्की आणि अभूतपूर्व घोषणाबाजी

वसई-विरार महासभेत विकासकामांच्या मुद्द्यावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आपापसात भिडले; हमरीतुमरी आणि धक्काबुक्कीमुळे सभागृहात प्रचंड तणाव निर्माण होऊन कामकाज ठप्प.

Read more

error: Content is protected !!