काळबादेवी येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम बनप यांचे देहदान; वैद्यकीय महाविद्यालयातील २४ वे दातृत्व

रत्नागिरी : प्रतिनिधी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच २४ वे मरणोत्तर देहदान पार पडले. काळबादेवी येथील ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक दिवंगत तुकाराम शंकर बनप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पूर्वइच्छेनुसार आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने त्यांचा देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.
​तुकाराम बनप यांनी २९ जानेवारी २०२५ रोजी देहदानाचे इच्छापत्र दिले होते. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली. दिवंगत बनप यांनी बसणी येथील शाळेत मुख्य लिपिक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. काळबादेवी गावात सामाजिक सलोखा टिकवण्यात आणि निस्वार्थी समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा होता.
​विशेष म्हणजे, दिवंगत बनप यांची नात कु. पायल हिने नुकतेच बीएचएमएस (BHMS) चे शिक्षण पूर्ण केले आहे. नात वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करत असतानाच, आजोबांनी भावी डॉक्टरांच्या शिक्षणासाठी देहदान केल्याने या कुटुंबाचे वैद्यकीय क्षेत्राशी प्रेरणादायी ऋणानुबंध जोडले गेले आहेत. याप्रसंगी बनप कुटुंबीय, बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि काळबादेवीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत बनप यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Related Posts

निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेविरोधात चिपळुणात मविआचा मोर्चा

चिपळूण : प्रतिनिधी मतदार यादीतील ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी चिपळूण शहरात मोर्चा काढण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या…

Read more

रत्नागिरीत केंद्रीय विद्यालय आणि ऐतिहासिक टिळक विद्यालयाचे लोकार्पण; ‘टीकेला कामातून उत्तर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरला आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि ऐतिहासिक टिळक विद्यालयाच्या पुनर्बांधणीचा…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Anspruchsvolle_Unterhaltung_von_Einzahlung_bis_zum_Gewinn_mit_https_ninescasino-

  • By admin
  • October 7, 2026
  • 2 views

Gebruikersvoordelen_van_een_slimme_aanpak_met_thebetorys-nl_nl_voor_dagelijkse_t

  • By admin
  • October 7, 2026
  • 2 views

Free Spins and Fan Favorites in Online Casino Gaming with OnlyFans Models

  • By admin
  • October 7, 2026
  • 2 views

निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेविरोधात चिपळुणात मविआचा मोर्चा

  • By admin
  • October 7, 2026
  • 3 views
निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेविरोधात चिपळुणात मविआचा मोर्चा

Casino Games and Slot Machines on OnlyFans Search Engine

  • By admin
  • October 7, 2026
  • 3 views

काळबादेवी येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम बनप यांचे देहदान; वैद्यकीय महाविद्यालयातील २४ वे दातृत्व

  • By admin
  • October 7, 2026
  • 3 views
काळबादेवी येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम बनप यांचे देहदान; वैद्यकीय महाविद्यालयातील २४ वे दातृत्व
error: Content is protected !!