बाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी

ठाणे:

मानपाडा परिसरातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या हाती नवे धागेदोरे लागले आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात नीलेश पवार याने पूर्णेकरांवर थेट गोळ्या झाडल्या, तर त्याचा साथीदार निखिल यादव याने चॉपरने सपासप वार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता एका ‘लावण्य’ नावाच्या तरुणीची एन्ट्री झाली असून, विशेष तपास पथकाने (SIT) तिची कसून चौकशी सुरू केली आहे.

संशयित ‘लावण्य’ आणि हत्येचे कनेक्शन? पूर्णेकर यांचा मुलगा राम याने पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात या तरुणीचा उल्लेख केला आहे. हत्येच्या वेळी ही तरुणी घटनास्थळाच्या परिसरात संशयास्पदरीत्या वावरत होती, असा दावा रामने केला आहे. काही दिवसांपूर्वी बाळू पूर्णेकर यांनी या तरुणीला दोन व्यक्तींसह एका खोलीत पकडले होते. त्यामुळे तिच्या मनात पूर्णेकरांबद्दल तीव्र राग होता, असेही या जबाबात नमूद करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे एसआयटीने गुरुवारी तिची चौकशी केली. तिचा या हत्येशी थेट संबंध आहे का, हे पोलीस तपासातच उघड होणार आहे.

मंगळवारी रात्री हा हल्ला झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या एसआयटीने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनेच्या दिवशीच सुभाष ऊर्फ पप्प्या शिंदे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्य मारेकरी नीलेश पवार आणि निखिल यादव यांना कर्नाळा अभयारण्य परिसरातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदेंची ‘नार्को’ करा: सुषमा अंधारे या हत्याकांडावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पूर्णेकर यांच्या हत्येसाठी तब्बल १५ दिवस आधीपासून रेकी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी हॉटेल महाराजाचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, सर्व आरोपी व संशयितांचे सीडीआर (CDR) तपासून त्यांची साखळी शोधावी, तसेच मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची ‘नार्को’ चाचणी करावी, अशी आक्रमक मागणी अंधारे यांनी केली आहे.

ठाण्यात ९ ऑक्टोबरला ‘भयमुक्त ठाणे’ मोर्चा बाळू पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता निष्पक्षपणे व्हावा आणि ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. मनसे, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि धर्मराज्य पक्षाच्या वतीने ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता ठाणे पोलीस आयुक्तालयावर ‘भयमुक्त ठाणे’ या मागणीसाठी विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे

 

Related Posts

बाळू पूर्णेकर हत्याकांड: “नगरसेवक पद वाचवण्यासाठीच काटा काढला”, भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात

ठाणे : प्रतिनिधी मानपाडा परिसरातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. येथील स्थानिक नगरसेविकेचा…

Read more

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजकीय स्वार्थापोटी मला गोवण्याचा प्रयत्न; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचे सडेतोड प्रत्युत्तर

ठाणे : अशोक घाग प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काडीमात्र संबंध नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी ‘टाळूवरचे लोणी खाण्याचा’ हा निंदनीय प्रकार सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Exceptional_gaming_experiences_featuring_https_luckywave-casinos_uk_offer_substa

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Fantasierijke_collecties_onthullen_de_schoonheid_van_luckygem_en_persoonlijke_ve

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Մելա Բեթ – Վաստակում Ապահորի Գայթակգզմունքը

  • By admin
  • October 5, 2026
  • 0 views

Innowacyjne_metody_gry_w_kasynie_online_od_strategii_po_bonusy_z_https_magnetic-

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Opcje_gry_magneticslotscasinos_com_pl_w_bezpiecznym_i_odpowiedzialnym_środowisk

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views

Fantastische_mogelijkheden_verkennen_met_luckygem_voor_een_onvergetelijke_tijd

  • By admin
  • October 5, 2026
  • 2 views
error: Content is protected !!