नाशिक हादरलं! संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

नाशिक :

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि ‘प्रति पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण आध्यात्मिक आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, गुन्हा दाखल होताच विश्वस्त मंडळाने साळुंखे यांची अध्यक्षपदावरून तात्काळ हकालपट्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. राहुल साळुंखे यांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडित महिलेशी जवळीक साधली आणि तिचे वारंवार शारीरिक व लैंगिक शोषण केले. मात्र, काही कालावधीनंतर पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता साळुंखे यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तिला टाळण्यास सुरुवात केली. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धाडस दाखवत पीडित महिलेने थेट नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी सविस्तर फिर्याद दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार साळुंखे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच कारवाईच्या भीतीने आरोपी राहुल साळुंखे हा पसार झाला असून, नाशिक पोलिसांची विविध पथके त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, एका मोठ्या आणि पवित्र आध्यात्मिक देवस्थानच्या अध्यक्षावरच असा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत संत निवृत्तिनाथ संस्थानच्या विश्वस्त मंडळाने तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून साळुंखे यांच्या हकालपट्टीचा ठराव मांडण्यात आला आणि तो एकमताने मंजूर करत त्यांना अध्यक्षपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.

Related Posts

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उपनेते शरद कोळींवर MPDA अंतर्गत कारवाई; १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सोलापूर: सत्ताधाऱ्यांच्या टीकेला अत्यंत आक्रमक आणि ‘जशास तसे’ उत्तर देणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शरद कोळी यांच्यावर…

Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पेपरफुटीच्या वादात एमपीएससी (MPSC) सचिव पदमुक्त

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी आणि अनियमिततेच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक कठोर पाऊल उचलले आहे. सरकारने तात्काळ प्रभावाने एमपीएससीचे सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Valore_e_riflessi_nel_gioco_chickenroad_sfida_lattraversamento_pieno_di_pericoli

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Effectieve_planning_en_https_zombillion-netherlands_nl_voor_optimale_financiële

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Fascinerende_kansen_biedt_zombillion_casino_voor_de_serieuze_speler_vandaag

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Strategy_and_benefits_of_playing_at_a_non_uk_registered_casino_offer_distinct_fl

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Emocjonująca_rozgrywka_i_świetne_szanse_z_magneticslots_w_nowoczesnych_kasynac

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Élégantes_opportunités_ludiques_avec_betify_casino_et_gains_exceptionnels_gar

  • By admin
  • October 6, 2026
  • 3 views
error: Content is protected !!