शिक्षक ई-केवायसीत राजापूर तालुक्याची शून्य कामगिरी, मंडणगड अव्वल

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या ई-केवायसी प्रक्रियेत राजापूर तालुक्याने अत्यंत निराशाजनक कामगिरी नोंदवली आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत एकाही शिक्षक अथवा केंद्रप्रमुखाचा प्रस्ताव पुढे न पाठवल्याने राजापूरची प्रगती थेट शून्य टक्क्यांवर अडखळली आहे. याउलट, मंडणगड तालुक्याने तब्बल ९३.५८ टक्के काम पूर्ण करत जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ही मोहीम तातडीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले होते, तरीही संपूर्ण जिल्ह्यातील ५ हजार ३०० कर्मचाऱ्यांपैकी जिल्ह्याची सरासरी केवळ ६८.९८ टक्क्यांवरच थांबली आहे.
अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील ४ हजार १६१ कर्मचाऱ्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी ३ हजार ६५६ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून १७० प्रस्ताव त्रुटींमुळे बाद झाले आहेत, तर ३३५ प्रस्ताव अजूनही तपासणीच्या पातळीवर प्रलंबित आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे १ हजार १३९ कर्मचाऱ्यांनी अद्याप प्रक्रियेला सुरुवातच न केल्याने जिल्ह्यात एकूण १ हजार ६४४ शिक्षकांची ई-केवायसी लटकलेली आहे. यामध्ये राजापूरमधील ६३५ शिक्षक आणि ३२ केंद्रप्रमुख अशा एकूण ६६७ जणांपैकी एकानेही प्रस्ताव सादर न केल्याने मोठी उदासीनता समोर आली आहे.
याशिवाय, संगमेश्वर तालुक्यातीलही ३५ केंद्रप्रमुखांपैकी एकानेही आपली नोंदणी पुढे पाठवलेली नाही. त्यामुळे “जबाबदार अधिकाऱ्यांनीच नियमांकडे पाठ फर्सवल्यास शिक्षकांकडून काय अपेक्षा ठेवायची?” असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास संबंधितांचे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत शासन या मोहिमेला मुदतवाढ देऊन दिलासा देणार की वेतनावर थेट कारवाईचा बडगा उगारणार, याकडे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Posts

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : प्रतिनिधी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. या एकदिवसीय दौऱ्यानिमित्त ते जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी…

Read more

अलोरे येथे राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियान उत्साहात; शासकीय योजनांचे महिला व पालकांना प्रबोधन

चिपळूण : प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना चिपळूण-१ (दादर-२ बीट) अंतर्गत अलोरे येथे ९ वा राष्ट्रीय पोषण माह आणि ‘सेवा संकल्प अभियान’ विविध उपक्रमांनी अत्यंत उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रपिता महात्मा…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Roulette Spiele mit guten Auszahlungsquoten in einem Online Casino spielen

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views

Die besten Casino Spiele – Vergleich aller Casino Spiele

  • By admin
  • October 6, 2026
  • 1 views

Würfel in Wuppertal – Leben am Glücksspielautomaten Casino Wuppertal

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Rywalizuj w Gry Automatyczne na GXBet – Symbole Wygranej Ustawiają Ciebie w Ruch

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Sportunas laukuma svinības loču dambis

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर
error: Content is protected !!