उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा: जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे रत्नागिरीत आवाहन

रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उत्तम आरोग्यासाठी आणि शरीराच्या लवचिकतेसाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगाचा समावेश करावा, असे आवाहन केले. पाश्चिमात्य जगाने आज भारताची योग संस्कृती स्वीकारली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read more

error: Content is protected !!