संजय राऊत मानहानी प्रकरण: भाजप नेते नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट जारी

खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी माझगाव न्यायालयाने भाजप नेते नितेश राणे यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. सलग दोन सुनावणीला गैरहजर राहिल्याने कोर्टाने ही कारवाई केली.

Read more

कार्यकारी अध्यक्षपदाच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही; आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण

शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांची ‘कार्यकारी अध्यक्ष’पदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चांचे स्वतः आदित्य ठाकरे यांनी खंडन केले आहे. सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण देताना त्यांनी अशा कोणत्याही चर्चा पक्षात सुरू नसल्याचे सांगितले, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

Read more

विरोधी पक्षांचे अस्तित्व संपवण्यासाठी भाजपला हवी तशी मतदारसंघांची पुनर्रचना; संजय राऊत यांचा प्रहार

भाजपने मतदारसंघांची पुनर्रचना आपल्या सोयीनुसार करण्याचे कारस्थान रचले असून, विरोधी पक्षांचे अस्तित्व संपवण्याचा हा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचा घणाघात शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूक आयोग भाजपच्या ताटाखालचे मांजर झाल्याची टीका करत त्यांनी याविरोधात सर्वपक्षीय लढ्याचे संकेत दिले आहेत.

Read more

९० हजार कोटींच्या ठेवी मोडून खाताय, पण संयुक्त महाराष्ट्र दालनासाठी पैसे नाहीत का? संजय राऊतांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सवाल

संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ९० हजार कोटींच्या मुदत ठेवी खर्च करण्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. संयुक्त महाराष्ट्र दालनासाठी निधी उपलब्ध नसल्याच्या कारणावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले असून, सरकार केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याचा आरोप केला आहे.

Read more

अशोक खरात प्रकरण: भोंदू बाबाच्या मुलाला बेड्या, पत्नी फरार; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्र तापला!

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई करत त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याला नाशिकमधून बेड्या ठोकल्या आहेत, तर पत्नी कल्पकना खरात सध्या फरार आहे. कोट्यवधींची फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नेमके काय आहे हे प्रकरण आणि कोणाचे धाबे दणाणले आहेत, वाचा सविस्तर…

Read more

अशोक खरात प्रकरणी महिला बालविकास मंत्र्यांनी भूमिका मांडावी; संजय राऊत यांचा अदिती तटकरेंना टोला

भोंदू अशोक खरात प्रकरणी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे वडील खरातचे भक्त होते, असा खळबळजनक दावा करत राऊत यांनी तटकरेंनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Read more

‘खरात प्रकरणाचा रिमोट कंट्रोल मंत्रालयात; केवळ एका महिला नेत्याचा बळी देऊन चालणार नाही’; संजय राऊत यांचा हल्लाबोल

अशोक खरात हा केवळ भोंदू बाबा नसून मंत्रालयातील बदल्यांच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार होता; केवळ एका महिला नेत्याचा बळी देऊन चालणार नाही,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केला आहे. खरातला राजकीय संरक्षण देणाऱ्या इतर बड्या मंत्र्यांचे राजीनामे कधी घेणार, असा सवाल करत राऊत यांनी या प्रकरणाला ‘मोठे सेक्स स्कँडल’ संबोधले आहे

Read more

राज्यसभा निवडणुकीत भाजपवर ‘क्रॉस वोटिंग’चा आरोप; संजय राऊत यांचा प्रहार

राज्यसभा निवडणुकीत भाजपने पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून ‘क्रॉस वोटिंग’ घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. लोकशाहीचा गळा आवळून मतांचा बाजार भरवला गेला असून, गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read more

“नाल्यातून गॅस काढा आणि चुली पेटवा!” गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

मुंबई (प्रतिनिधी): आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सध्या व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून यावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय…

Read more

संजय राऊतांना मोठा दिलासा! मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना न्यायव्यवस्थेकडून मोठा दिलासा मिळाला असून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबई…

Read more

error: Content is protected !!