संजय राऊत यांचा बंडखोरांवर मोठा हल्ला: नव्या गटात गेल्यावर ठेकेदारीचे निधी मिळतील, २५ टक्के सरळ घरात जातील

“विरोधात असल्याने निधी मिळत नाही असे सांगून गद्दारी करणाऱ्या ६ बंडखोर खासदारांचा कोट्यवधींचा विकासनिधी तसाच पडून असून त्यांनी मतदारांची दिशाभूल केली आहे; आता नव्या गटात त्यांना केवळ ठेकेदारी आणि कमिशनचा मानसन्मान मिळेल,” अशा शब्दांत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर तीखा प्रहार केला.

Read more

‘ऑपरेशन टायगर’ला ‘ऑपरेशन वोल्फ’ने उत्तर देऊ; संजय राऊत यांचा विरोधकांना कडक इशारा

संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना (उबाठा) नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार फुटीच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे की, जर आमच्या खासदारांना फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवले गेले, तर त्याला ‘ऑपरेशन वोल्फ’ने चोख उत्तर दिले जाईल.

Read more

‘शिवसेनेचे खासदार एकत्र आहेत अन् एकत्रच राहतील!’; संजय राऊत यांनी उडवून लावल्या फुटीच्या अफवा, भाजपवर डागली तोफ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटणार असल्याच्या आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पूर्णविराम लावला आहे. “पक्षाचे सर्व खासदार एकत्र आहेत आणि एकत्रच राहतील,” असे ठामपणे सांगत त्यांनी भाजपच्या फोडोफोडीच्या राजकारणावर तीव्र प्रहार केला. तसेच, उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत हा दावा खोटा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या ‘ईडी-सीबीआय’च्या धाकाची पिसं काढली आहेत.

Read more

संजय राऊत यांचा शिंदे गट आणि भाजपवर निशाणा; ‘ऑपरेशन टायगर’चा दावा फेटाळला

शिवसेनेचे सर्व खासदार एकजूट असून विरोधकांचे ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपला लगावला आहे. ‘मातोश्री’वरील बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन हजेरी लावल्याचे स्पष्ट करत, त्यांनी विरोधकांच्या अफवांना चोख प्रत्युत्तर दिले.

Read more

राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात; लवकरच उद्धव ठाकरेंसोबत अयोध्या दौरा करणार

अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतून ५ कोटी रुपयांची चोरी झाल्याचा खळबळजनक आरोप करत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत लवकरच अयोध्या दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Read more

काँग्रेस महिला उमेदवाराचा अर्ज बाद केल्याप्रकरणी संजय राऊतांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाल्याने संजय राऊत यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली ही कारवाई झाली असून ‘नारी सन्मान’च्या नावाखाली भाजप दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Read more

‘दादरमध्ये बेकाबू बेस्ट बसने अनेक वाहनांना चिरडले; अपघातात एकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी’

मुंबईतील दादर परिसरात सोमवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला, जिथे एका भरधाव बेस्ट (BEST) बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली. दादरमधील वीर कोतवाल गार्डन आणि प्लाझा सिनेमा परिसरात घडलेल्या या दुर्घटनेत ओलेक्ट्रा कंपनीच्या बेस्ट बसने टॅक्सी, ओला-उबर कार आणि दुचाकींसह अनेक वाहनांना चिरडले. या अपघातात एका अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, बस वाहकासह अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे दादर मार्केट परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Read more

‘मतांची चोरी करून सत्तेत आलेल्या सरकारला हटवणे हाच ‘इंडिया’ आघाडीचा एकमेव अजेंडा’ – संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर मतांची चोरी आणि दरोडेखोरी करून सत्ता मिळवल्याचा घणाघाती आरोप केला आहे. दिल्लीतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीपूर्वी मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, या भ्रष्ट सरकारला सत्तेवरून हटवणे हाच आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. तसेच २०२९ च्या निवडणुकीआधी आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा, ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read more

ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई; बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी!

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीची कोंडी करणाऱ्या बाळ माने यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, या नाट्यमय घडामोडींमुळे कोकणातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

Read more

नीट पेपर लीकचा खरा सूत्रधार सत्ताधारी पक्षच; अटक झालेले सर्व आरोपी त्यांचेच कार्यकर्ते; संजय राऊतांचा गंभीर आरोप

नीट पेपर लीक प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्षावर तीव्र हल्लाबोल केला आहे. या घोटाळ्याचा खरा सूत्रधार सत्ताधारी पक्षच असून अटक करण्यात आलेले सर्व आरोपी त्यांचेच कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे, तसेच या संपूर्ण प्रकाराला देशावरील शैक्षणिक अणुबॉम्बची उपमा दिली आहे.

Read more

error: Content is protected !!