ठाणे : अशोक घाग
ठाणे पश्चिमेकडील सिद्धेश्वर तलावाजवळील सर्व्हिस रोडवर सुरू असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) एलिव्हेटेड रोडच्या बांधकाम साइटवर एक मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामादरम्यान एक हायड्रॉलिक क्रेन अचानक रस्त्यावर कोसळली. या दुर्घटनेत रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, दोघे जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीएच्या एलिव्हेटेड रोडचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. हायड्रॉलिक क्रेन अचानक कोसळल्याने त्याखाली एक रिक्षा सापडली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, रिक्षाचालक आणि रिक्षामधील एक प्रवासी असे दोघेही जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले. दोन्ही जखमींना तात्काळ नजीकच्या ‘लेक सिटी हॉस्पिटल’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ऐन वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
ठाणे महापालिकेत टेंडरवरून वाद पेटला; अभियंत्याचा अपमान केल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
ठाणे : अशोक घाग ठाणे महानगरपालिकेत टेंडर प्रक्रियेवरून मोठा वाद पेटला असून, एका अधिकाऱ्याचा अवमान केल्याच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे पालिकेचे कामकाज…
Read more






