रत्नागिरीच्या राजवीर पोवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; हरचिरीच्या मल्लाची लाल मातीत दमदार कामगिरी

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुका आणि जिल्हा स्तरावर आपल्या कुस्तीचे निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर हरचिरी (ता. रत्नागिरी) येथील युवा मल्ल राजवीर सतीश पोवार याने आता थेट राज्यस्तरावर धडक मारली आहे. सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील ३८ किलो वजनी गटात राजवीरने अद्वितीय कौशल्य दाखवत राज्यस्तरीय स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हरचिरी-उमरे येथील महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिराचा विद्यार्थी असलेल्या राजवीरसमोर विभागस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर विभागातील मातब्बर मल्लांचे मोठे आव्हान होते. मात्र, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतींमध्ये राजवीरने आपल्या चपळ हालचाली, अचूक पकड आणि प्रभावी डावपेचांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना आस्मान दाखवले. कुस्तीच्या फडात त्याने दाखवलेला कमालीचा संयम आणि आक्रमक पवित्र्यामुळे उपस्थित क्रीडाप्रेमींसह पंचांनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले.
राजवीरच्या या यशामागे त्याची प्रचंड जिद्द, नियमित सराव आणि शाळेचे क्रीडा शिक्षक मारुती गलांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. गलांडे सरांनी राजवीरमधील कौशल्य अचूक हेरून त्याच्याकडून कसून तांत्रिक तयारी व रणनीतीची आखणी करून घेतली. या देदीप्यमान यशाबद्दल शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि हरचिरी ग्रामस्थांकडून राजवीर व त्याच्या मार्गदर्शकांचे उत्स्फूर्त अभिनंदन केले जात आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही त्याला सर्व स्तरांतून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Posts

रत्नागिरी जिल्हा ‘शून्य कुपोषित’ करणार; पोषण माह कार्यशाळेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा संकल्प

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा भविष्यात पूर्णपणे कुपोषणमुक्त व्हावा आणि जिल्ह्यात एकही कुपोषित बालक राहू नये, यासाठी प्रशासनाने आणि आरोग्य यंत्रणेने दर्जेदार पोषण आहारावर भर देऊन जबाबदारीने काम करावे, असे…

Read more

मुंबई-गोवा महामार्गावर दोन कंटेनरची जोरदार धडक; एक चालक जखमी, वाहतूक विस्कळीत

लांजा : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ (ता. लांजा) असलेल्या तीव्र उताराच्या धोकादायक वळणावर गुरुवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास दोन कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात एका कंटेनरचा चालक जखमी…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Das Glück bei Spielautomaten 96 liegt im Zufall

  • By admin
  • October 8, 2026
  • 0 views

Αξιολόγηση_κριτηρίων_και_προϋποθέσεων_γύρω

  • By admin
  • October 8, 2026
  • 0 views

Excitement_unfolds_from_casino_bonuses_to_thrilling_games_via_https_vegasheros-c

  • By admin
  • October 8, 2026
  • 2 views

Fantastische_aanbiedingen_en_https_zombillions-netherlands_nl_voor_slimme_budget

  • By admin
  • October 8, 2026
  • 1 views

Exceptional_bonuses_and_https_vegashero-casinos_uk_provide_thrilling_casino_expe

  • By admin
  • October 8, 2026
  • 2 views

Avantajul_ascuns_al_divertismentului_modern_este_the-nvcasino-ro1_com_o_poartă

  • By admin
  • October 8, 2026
  • 2 views
error: Content is protected !!