पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रत्नागिरी पोलीस दलात ५ अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचे मजबूत कवच मिळाले आहे. समुद्रात बुडणाऱ्या नागरिकांचे प्राण तत्काळ वाचवण्यासाठी ५ अत्याधुनिक ‘लाईफ सेव्हिंग रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ (Life Saving Robotic Water Craft) आज जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
​रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मात्र, पाण्याचा आणि लाटांचा अचूक अंदाज न आल्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल १४३ पर्यटकांचा आणि नागरिकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हे हायटेक रोबोटिक वॉटर क्राफ्ट्स यंत्रणेत समाविष्ट केले आहेत. समुद्रातील प्रचंड लाटा आणि प्रतिकूल हवामानातही हे रोबोट्स संकटात सापडलेल्या व्यक्तीपर्यंत अतिशय वेगाने पोहोचून त्यांचे प्राण वाचवू शकतील. यामुळे पोलिसांचे बचावकार्य अधिक गतिमान आणि प्रभावी होणार आहे.
​हे अत्याधुनिक रोबोट्स पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या गणपतीपुळे, दापोलीतील मुरुड-लाडघर, गुहागर आणि आरे-वारे या प्रमुख किनाऱ्यांवर तैनात केले जाणार आहेत. या हस्तांतरण सोहळ्याला आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या नव्या यंत्रणेमुळे किनाऱ्यांवरील दुर्घटनांना मोठा आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Posts

रत्नागिरी जिल्हा ‘शून्य कुपोषित’ करणार; पोषण माह कार्यशाळेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा संकल्प

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा भविष्यात पूर्णपणे कुपोषणमुक्त व्हावा आणि जिल्ह्यात एकही कुपोषित बालक राहू नये, यासाठी प्रशासनाने आणि आरोग्य यंत्रणेने दर्जेदार पोषण आहारावर भर देऊन जबाबदारीने काम करावे, असे…

Read more

रत्नागिरीच्या राजवीर पोवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; हरचिरीच्या मल्लाची लाल मातीत दमदार कामगिरी

रत्नागिरी : प्रतिनिधी तालुका आणि जिल्हा स्तरावर आपल्या कुस्तीचे निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर हरचिरी (ता. रत्नागिरी) येथील युवा मल्ल राजवीर सतीश पोवार याने आता थेट राज्यस्तरावर धडक मारली आहे. सातारा येथे…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Anregungen_für_dein_Glücksspiel_finden_sich_abwechslungsreich_bei_wingagacasin

  • By admin
  • October 8, 2026
  • 0 views

Effektive_Lösungen_und_winbeatz-germany_com_de_für_kreative_Audio-Innovationen

  • By admin
  • October 8, 2026
  • 0 views

Sjove selskabsspil til næste fest og hyggelige aften

  • By admin
  • October 8, 2026
  • 1 views

रत्नागिरी जिल्हा ‘शून्य कुपोषित’ करणार; पोषण माह कार्यशाळेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा संकल्प

  • By admin
  • October 8, 2026
  • 0 views
रत्नागिरी जिल्हा ‘शून्य कुपोषित’ करणार; पोषण माह कार्यशाळेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा संकल्प

रत्नागिरीच्या राजवीर पोवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; हरचिरीच्या मल्लाची लाल मातीत दमदार कामगिरी

  • By admin
  • October 8, 2026
  • 1 views
रत्नागिरीच्या राजवीर पोवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; हरचिरीच्या मल्लाची लाल मातीत दमदार कामगिरी

ठाण्यात एमएमआरडीएच्या बांधकाम साइटवर हायड्रॉलिक क्रेन कोसळली; रिक्षाचे नुकसान, दोन जण जखमी

  • By admin
  • October 8, 2026
  • 2 views
error: Content is protected !!