रत्नागिरी जिल्हा ‘शून्य कुपोषित’ करणार; पोषण माह कार्यशाळेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा संकल्प

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा भविष्यात पूर्णपणे कुपोषणमुक्त व्हावा आणि जिल्ह्यात एकही कुपोषित बालक राहू नये, यासाठी प्रशासनाने आणि आरोग्य यंत्रणेने दर्जेदार पोषण आहारावर भर देऊन जबाबदारीने काम करावे, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पोषण माह व मानसिक आरोग्य सप्ताह कार्यशाळे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोरोना काळातील आठवणींना उजाळा देताना डॉ. सामंत यांनी आरोग्य यंत्रणेचे भरभरून कौतुक केले. महामारीच्या भयंकर संकटात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, डॉक्टर आणि परिचारिकांनी मानधनाचा विचार न करता, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देवासारखे धावून येत अतुलनीय सेवा दिली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. रत्नागिरी जि.प. ने सुरू केलेला शालेय विद्यार्थ्यांचा ‘इस्रो’ आणि ‘नासा’ भेट उपक्रम आज संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरला असून, माळरानावर पहिला सोलर प्रकल्प उभारण्याचा बहुमानही रत्नागिरीने मिळवला असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. याचबरोबर, आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच सतर्क राहून योग्य नियोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी दिले.

Related Posts

रत्नागिरीच्या राजवीर पोवारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड; हरचिरीच्या मल्लाची लाल मातीत दमदार कामगिरी

रत्नागिरी : प्रतिनिधी तालुका आणि जिल्हा स्तरावर आपल्या कुस्तीचे निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर हरचिरी (ता. रत्नागिरी) येथील युवा मल्ल राजवीर सतीश पोवार याने आता थेट राज्यस्तरावर धडक मारली आहे. सातारा येथे…

Read more

मुंबई-गोवा महामार्गावर दोन कंटेनरची जोरदार धडक; एक चालक जखमी, वाहतूक विस्कळीत

लांजा : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ (ता. लांजा) असलेल्या तीव्र उताराच्या धोकादायक वळणावर गुरुवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास दोन कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात एका कंटेनरचा चालक जखमी…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Αξιολόγηση_κριτηρίων_και_προϋποθέσεων_γύρω

  • By admin
  • October 8, 2026
  • 0 views

Excitement_unfolds_from_casino_bonuses_to_thrilling_games_via_https_vegasheros-c

  • By admin
  • October 8, 2026
  • 1 views

Fantastische_aanbiedingen_en_https_zombillions-netherlands_nl_voor_slimme_budget

  • By admin
  • October 8, 2026
  • 1 views

Exceptional_bonuses_and_https_vegashero-casinos_uk_provide_thrilling_casino_expe

  • By admin
  • October 8, 2026
  • 0 views

Avantajul_ascuns_al_divertismentului_modern_este_the-nvcasino-ro1_com_o_poartă

  • By admin
  • October 8, 2026
  • 1 views

Anregungen_für_dein_Glücksspiel_finden_sich_abwechslungsreich_bei_wingagacasin

  • By admin
  • October 8, 2026
  • 2 views
error: Content is protected !!