पक्ष सोडण्यापूर्वी खबरदारी घेत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून माजी आमदार संजय कदम यांची हकालपट्टी !

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला दिवसागणिक धक्के बसत आहेत. एकेकाचे निष्ठावंत हळू हळू ठाकरेंची साथ सोडत आहेतच. मात्र राजकीय वैमनस्यामुळे का होईना ठाकरेंच्या सेनेत टिकून राहिलेले देखील आता राजकीय वैर संपवून एकत्र येत असल्याचे पहायला मिळत आहे.

माजी मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास भाई कदम याचे कट्टर विरोधक असलेले संजय कदम आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र संजय कदम यांच्या प्रवेशापूर्वीच सावध भूमिका घेत शिवसेना उबाठापक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे पत्रक सेना भवनातून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

शिवसेना उबाठा पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी करण्यात येत आहे.

रत्नागिरी (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

Related Posts

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल
error: Content is protected !!