जिल्ह्यात उद्या पाच ठिकाणी मॉक ड्रील; अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हाधिकारी

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात उद्या बुधवार सायंकाळी ४ वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे. याठिकाणी सायरन वाजविला जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

मंगळवारी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम नियोजन व पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सहायक उपनियंत्रक धमेंद्र जाधव, संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रत्नागिरी तहसिलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत येथे उद्या सायंकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथोमोपचार या बाबी सज्ज असणे आवश्यक आहे. यामध्ये आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांचा समावेश करावा. जिल्ह्यातील तालुकास्तरीय यंत्रणांनी आपले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावे.

उद्या मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक आदी कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयांनी मॉक ड्रिल करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा अशा सूचना, जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी बैठकीत दिल्या.
बैठकीच्या सुरुवातील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी मॉक ड्रिलच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली.

दरम्यान बुधवारी ४ वाजता जिल्ह्यातील पाच ठिकाणी आॕपरेशन अभ्यास अंतर्गत सायरन वाजवला जाणार आहे. रंगीत तालीम करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Posts

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कसोप ते कोळंबे फाटा या मार्गावर ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा…

Read more

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या यशाची घोडदौड कायम राखत ३० सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ६००० कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. ग्राहकांचा दृढ…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

  • By admin
  • October 3, 2026
  • 2 views
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा

चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा

दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
दापोलीत भातपिकासाठी युरिया व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल

  • By admin
  • October 3, 2026
  • 3 views
मुंबई: सीजेपीचे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन, ५०० आंदोलकांवर एफआयआर (FIR) दाखल
error: Content is protected !!