मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन; ‘कॉकरोच जनता पार्टी’चा इशारा

नवी दिल्ली :  ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आक्रमक पवित्रा घेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी येत्या ४८ तासांत आपल्या पदाचा राजीनामा न…

Read more

उद्धव ठाकरे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल: ‘…तर कमळ मोहीम हाती घ्यावीच लागेल!’

मिलावटी रक्त भगवा हाती घेऊ शकत नाही, अशी सणसणीत टीका करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सोहळ्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, त्यांनी गद्दार खासदारांवर निशाणा साधला आणि सोन्यासारखी शिवसेना चोरांच्या हाती जाऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

Read more

विरोधी पक्षांना फोडून भाजप देशात लोकशाहीचा गळा घोटतोय; आप नेते संजय सिंह यांचा घणाघाती आरोप

तृणमूल काँग्रेसमधील संभाव्य फुटीच्या चर्चांवरून ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर ‘लोकशाहीचा गळा घोटल्याचा’ तीव्र आरोप केला आहे. विरोधी पक्ष फोडण्याच्या भाजपच्या रणनीतीवर टीका करताना, “आता भाजपमध्ये जाण्यासाठी फक्त दाऊद इब्राहिमच उरला आहे,” असा टोला त्यांनी लगावला असून, जनतेने आवाज उठवला नाही तर भविष्यात निवडणुकांना काहीच अर्थ उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Read more

पक्ष फोडणे हाच भाजपचा खेळ; टीएमसीमधील फुटीनंतर संजय सिंह यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल!

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील (TMC) मोठ्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून विरोधी पक्ष फोडणे हाच भाजपचा देशातील मुख्य खेळ बनला असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

Read more

आपला मोठा धक्का! ७ खासदारांच्या भाजप प्रवेशावर संजय सिंह संतापले; राज्यसभेच्या सभापतींकडे केली ‘ही’ मागणी

आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने संजय सिंह यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली असून भाजपवर ‘ऑपरेशन लोटस’चा आरोप केला आहे.

Read more

मंत्रिमंडळात फक्त ४ महिला; मग आरक्षणाची भाषा कशाला? अंजली दमानियांचा देवेंद्र फडणवीसांवर प्रहार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ३९ पैकी केवळ ४ महिला मंत्री असताना आरक्षणाच्या गप्पा कशाला? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आकडेवारीनिशी जोरदार प्रहार केला आहे. ‘आधी ३३ टक्के महिला मंत्री करा, मग बँड वाजवून डान्स करू’ अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.

Read more

मोठी बातमी! बहुमताअभावी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक कोसळले; इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर झाली चिठ्ठ्यांची मोजणी

बहुमताअभावी लोकसभेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक कोसळले. इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर झालेल्या कागदी चिठ्ठ्यांच्या मोजणीत २९८ खासदारांनी बाजूने, तर २३० खासदारांनी विरोधात मतदान केले. आवश्यक संख्याबळ न मिळाल्याने विधेयक फेटाळले गेल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली.

Read more

बारामती पोटनिवडणूक: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; अजितदादांच्या आठवणीने वातावरण हेलावले

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत भावूक वातावरणात दाखल केला असून, अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर आता राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द केला असून, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आकाश मोरे यांना मैदानात उतरवल्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद घेतले आणि विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या या मतदानाचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असून बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read more

मानवता की राजकारण? नाव विचारले आणि ‘मुस्लिम’ असल्याचे समजताच दिलेले ब्लँकेट घेतले परत; भाजपच्या माजी खासदाराचा संतापजनक प्रकार

राजस्थान : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील निवाई तहसीलमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात गरजूंना ब्लँकेट वाटप करताना एका…

Read more

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: ६ मार्चला देवेंद्र फडणवीस मांडणार राज्याचा लेखाजोखा; अजितदादांच्या निधनानंतर अर्थकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

मुंबई: प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज २३ फेब्रुवारीपासून मोठ्या राजकीय घडामोडींनी सुरुवात झाली आहे. या अधिवेशनातील सर्वात महत्त्वाचा क्षण ६ मार्च रोजी येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी २:००…

Read more

error: Content is protected !!