जुन्नर अत्याचार प्रकरण: संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
राज्यात लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांवरून शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या संवेदनशील मुद्द्यावरून राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली आहे.
Read moreमुंबई लोकलच्या महिला प्रवाशांसाठी खूशखबर! स्थानकांवर आता दिसणार ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानकांवर लवकरच ‘पिंक स्टॉपिंग पॉईंट’ उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यामुळे गर्दीच्या वेळी महिला डबा नेमका कुठे थांबणार, हे ओळखणे आता अधिक सोपे होणार आहे.
Read moreखासगी बसमध्ये महिलेचा विनयभंग: क्लिनरचे संतापजनक कृत्य; बस थेट पोलीस ठाण्यात!
गोव्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसमध्ये एका महिला प्रवाशाचा क्लिनरने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर बस थेट कोलाड पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read moreदिल्ली: चालत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; वेळ विचारली असता आरोपींनी बसमध्ये ओढले
दिल्लीच्या राणीबाग भागात एका स्लीपर बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेळ विचारण्यासाठी गेलेल्या तीन मुलांच्या आईला ड्रायव्हर आणि कंडक्टरने जबरदस्तीने बसमध्ये ओढून अत्याचार केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून नियमबाह्य धावणारी बसही जप्त करण्यात आली आहे.
Read moreटीसीएस नाशिक प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी टीसीएस नाशिक प्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा अहवाल तयार केला असून यात महिला सुरक्षेबाबत महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत.
Read moreनरसापूर घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी
भोर तालुक्यातील नरसापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
Read moreबलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोल नाकारा; मंत्री अदिती तटकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडू नये, अशी आग्रही मागणी मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधि व न्याय विभागाला तातडीने कायदेशीर तरतुदीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून, महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे.
Read moreमहिला सुरक्षेसाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर! ‘पॉश’ अंतर्गत समित्या नसणाऱ्या कंपन्यांवर होणार कठोर कारवाई
कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या आस्थापनांची आता खैर नाही! ज्या खासगी किंवा सरकारी कार्यालयांमध्ये ‘पॉश’ कायद्यानुसार अंतर्गत तक्रार समिती नसेल, त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. यासाठी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
Read moreरत्नागिरी: अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या नराधमाला ३ वर्षांची सक्तमजुरी; न्यायालयाने सुनावली कडक शिक्षा
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि छळ करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. पीडितेला ४० हजार रुपये नुकसानभरपाई देखील मिळणार आहे.
Read moreनाशिक पुन्हा हादरले! नामांकित MNC कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार; ६ आरोपींना बेड्या
नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले असून पोलिसांनी ९ गुन्हे दाखल करत ६ आरोपींना अटक केली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) तैनात करण्यात आले आहे.
Read more










