फळबागायतदारांना हवामान आधारित विमा कवच !

आंबा, काजू, नारळ आणि सुपारी उत्पादकांना मोठा दिलासा

रत्नागिरी : प्रतिनिधी
बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे नुकसान लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारी या चार प्रमुख फळपिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, बागायतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या पिकांना विमा संरक्षण मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
​यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंबा पिकाचा विमा संरक्षण कालावधी १५ मे ऐवजी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला असून, शेतकऱ्यांचा विमा हप्ता हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांवरून थेट ८ हजार ५०० रुपये इतका कमी करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत प्रतिहेक्टर संरक्षित रक्कम आणि शेतकरी हप्ता निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार आंब्यासाठी १ लाख ७० हजार रुपयांच्या संरक्षणासाठी ८ हजार ५०० रुपये, नारळासाठी १ लाख ७० हजार रुपयांच्या संरक्षणासाठी ८ हजार ५०० रुपये, काजूसाठी १ लाख २० हजार रुपयांच्या संरक्षणासाठी ६ हजार रुपये, तर सुपारीसाठी १ लाख रुपयांच्या संरक्षणासाठी ५ हजार रुपये हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.
​जिल्ह्यातील अधिसूचित ८३ महसूल मंडळांमध्ये आंबा व काजू, ५३ मंडळांमध्ये नारळ आणि २३ मंडळांमध्ये सुपारीसाठी ही योजना लागू राहील. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार दोन्ही शेतकरी सहभागी होऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक असणे आणि ‘ई-पीक पाहणी’ भ्रमणध्वनी आज्ञावलीद्वारे पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे. शेतकरी ‘आपले सरकार सेवा केंद्र’, बँक किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरून हप्ता भरू शकतात. अर्जासोबत बागेचे भौगोलिक स्थान दर्शवणारे छायाचित्र संकेतस्थळावर जोडणे आवश्यक आहे.
​नारळ व सुपारी पिकांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असून, आंबा व काजू पिकांसाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी अखेरच्या दिवसांची वाट न पाहता तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी : प्रतिनिधी अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची अत्यंत सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले…

Read more

रत्नागिरीत काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधात मूकमोर्चा; ईव्हीएम बंद करण्याची आणि मुख्य आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

रत्नागिरी : प्रतिनिधी संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडक मूकमोर्चा काढण्यात आला. ईव्हीएम आणि…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Valore_e_riflessi_nel_gioco_chickenroad_sfida_lattraversamento_pieno_di_pericoli

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Effectieve_planning_en_https_zombillion-netherlands_nl_voor_optimale_financiële

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Fascinerende_kansen_biedt_zombillion_casino_voor_de_serieuze_speler_vandaag

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Strategy_and_benefits_of_playing_at_a_non_uk_registered_casino_offer_distinct_fl

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Emocjonująca_rozgrywka_i_świetne_szanse_z_magneticslots_w_nowoczesnych_kasynac

  • By admin
  • October 6, 2026
  • 0 views

Élégantes_opportunités_ludiques_avec_betify_casino_et_gains_exceptionnels_gar

  • By admin
  • October 6, 2026
  • 3 views
error: Content is protected !!