मुंबई गणेशमूर्ती दुर्घटना: आशिष शेलार यांच्याकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
मुंबईतील भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या मूर्ती आगमन सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मंत्री आशिष शेलार यांनी वैयक्तिक प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी करून दुरुस्ती करण्याचे कडक निर्देशही त्यांनी बीएमसीला दिले आहेत.
Read more‘भुलेश्वरच्या राजा’च्या आगमनावेळी २२ फुटी मूर्ती कोसळली; दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, ५ जखमी
मुंबईतील भुलेश्वर येथे गणेशोत्सवाच्या आगमनादरम्यान एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. ‘भुलेश्वरचा राजा’ या २२ फुटी गणपतीची मूर्ती अचानक कोसळल्याने २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Read moreमानखुर्द दुर्घटनाप्रकरणी कंत्राटदार व झोपडी मालकाला अटक; संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मुंबईतील मानखुर्द येथील मंडाळा परिसरात अनधिकृत चार मजली इमारत शेजारच्या झोपडीवर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी कंत्राटदार आणि झोपडी मालकाला अटक केली असून, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Read moreमुंबई दुर्घटना: जयंत पाटलांसोबत हसल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आमदार अमित साटम यांचे स्पष्टीकरण
मुंबईतील चेंबूर आणि साकीनाका येथील दुर्घटनांवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत हसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदार अमित साटम यांनी समोर येत, आपल्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ लावला गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
Read more




