विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा

मुंबई : राज्यातील शेतकरी हिताचे रक्षण करण्यासाठी आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन आता अधिक आक्रमक झाले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ नुसार राज्यातील शेतमाल व्यवहारांचे नियमन केले जाते. मात्र, अनेक व्यापारी, संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय शेतमालाची खरेदी-विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा विनापरवाना व्यवहारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत.

पणन संचालनालयाने यासंदर्भात विशेष परिपत्रक जारी केले असून, संबंधितांना वेळोवेळी सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. शासनाने ५ जुलै २०१६ आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या सुधारित तरतुदींनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात व्यापार करण्यासाठी आता परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जरी बाजार समितीमार्फत संबंधित परवानाधारकांकडून कोणतेही बाजार शुल्क आकारले जाणार नसले, तरी कायद्याच्या चौकटीत राहून परवाना प्राप्त करणे अनिवार्य आहे.

कायद्यातील कलम ५ (ड) अंतर्गत थेट पणन (Direct Marketing), खाजगी बाजार, शेतकरी-ग्राहक बाजार आणि ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठी परवाना देण्याची स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे सर्व व्यापारी, संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय शेतमाल व्यापार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या घटकांविरुद्ध कडक कायदेशीर पावले उचलली जातील, असा स्पष्ट इशारा पणन मंत्र्यांनी दिला आहे.

Related Posts

शिवाजी पार्कमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! सीजेपीच्या आंदोलनात ‘जय श्री राम’च्या घोषणा; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन सुरू असतानाच अचानक भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय श्री राम’च्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात…

Read more

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई: ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ मालमत्ता जप्त

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात एक मोठी आणि कठोर कारवाई करत ६४६.५८ कोटी रुपयांच्या तब्बल २११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईअंतर्गत ईडीने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्ये…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!