‘३७० रुपयांची बिर्याणी’ वाद: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रणीत मोरेसह तिघांवर सायबर विभागाने दाखल केला गुन्हा
स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या शोमधील ‘३७० रुपयांची बिर्याणी’ वरून झालेल्या अश्लील व आक्षेपार्ह वक्तव्याची महाराष्ट्र सायबर विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी मृतदेहांचा अवमान आणि महिलांविषयी चुकीची टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली प्रणीत मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चौकशीचे समन्स बजावण्यात आले आहे.
Read more






