देवरुख: इन्स्टाग्रामवरील संशयास्पद APK फाईलमुळे तरुणाची ५५ हजारांची ऑनलाईन फसवणूक
देवरुख : प्रतिनिधी सोशल मीडियावरून अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाऊनलोड करणे किती धोक्याचे ठरू शकते, याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद एपीके (APK)…
Read moreरत्नागिरीत सीएला साडेपाच लाखांचा ऑनलाइन गंडा; वडिलांचा मोबाईल हॅक करून फसवणूक
रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील तेली आळी येथील एका चार्टर्ड अकाऊंटंटला (सीए) अज्ञात सायबर भामट्याने तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्याने…
Read more९० मिनिटांत ३.७० कोटी गायब! छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीचा फोटो दाखवून ‘महाठगी’
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गारखेडा भागातील एका मोठ्या बांधकाम कंपनीच्या लेखापालाला जाळ्यात ओढून भामट्यांनी अवघ्या दीड तासात तीन…
Read more‘कुरिअर आलाय, हा नंबर डायल करा…’; एका फोनवर अभिनेत्री वनिता खरातचे व्हॉट्सॲप हॅक
मुंबई: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात सायबर फसवणुकीची शिकार झाली आहे. कुरिअर कंपनीच्या नावाने आलेल्या एका बनावट फोन कॉलमुळे वनिताचे थेट व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले. यानंतर सायबर भामट्यांनी तिच्या संपर्कातील मित्र-मैत्रिणींना मेसेज करून पैशांची मागणी केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे वाढत्या सायबर गुन्ह्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वनिता खरात यांनी स्वतः याबाबत माहिती देत घडलेला प्रकार उघड केला आहे. त्यांचे एक पार्सल येणार होते आणि नेमक्या त्याच वेळी त्यांना एका अज्ञाताचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने आपण कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे भासवले आणि डिलिव्हरी बॉयला घराचा पत्ता सापडत नसल्याचे कारण पुढे केले. त्यानंतर भामट्याने वनिता यांना फोनवर एक विशिष्ट नंबर डायल करण्यास सांगितला. वनिता यांनी तो नंबर डायल करताच काही क्षणांतच त्यांच्या मोबाईलमधून व्हॉट्सॲप आपोआप लॉगआऊट झाले. इतकेच नाही, तर त्यांच्या नंबरवर येणारे सर्व इन्कमिंग कॉल्स देखील भामट्यांनी डायव्हर्ट केले. व्हॉट्सॲपचा पूर्ण ताबा मिळवल्यानंतर या सायबर गुन्हेगारांनी वनिताच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना लक्ष्य केले. ‘मी सध्या अडचणीत आहे, मला तातडीने ६२ हजार रुपयांची आर्थिक मदत करा,’ अशा आशयाचे मेसेज भामट्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणींना पाठवण्यास सुरुवात केली. हा मेसेज वनितानेच पाठवला आहे, असा गैरसमज झाल्यामुळे तिच्या काही परिचितांनी खरोखरच त्या भामट्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचे वृत्त आहे. या धक्कादायक प्रसंगानंतर वनिता खरात यांनी त्वरित आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांना आणि परिचितांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या नावाने पैशांची मागणी करणारा मेसेज आल्यास थेट फोन करून खात्री केल्याशिवाय कोणालाही पैसे पाठवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कुरिअरच्या नावाने येणाऱ्या अशा अज्ञातांच्या कॉल्सपासून सावध राहावे आणि अनोळखी व्यक्तीने सांगितलेला कोणताही कोड, नंबर किंवा लिंक न वापरण्याचा इशारा या घटनेच्या निमित्ताने देण्यात आला आहे. कोणतीही कंपनी अशी वैयक्तिक माहिती किंवा कॉल डायव्हर्ट करणारे कोड मागत नाही, त्यामुळे नागरिकांनी अधिकृत ट्रॅकिंग सुविधेचाच वापर करावा.
Read moreनंदुरबारमध्ये अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश; २२ वर्षीय तरुणाकडून ३०० हून अधिक व्हिडिओ जप्त
नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुले आणि तरुणांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवणाऱ्या २२ वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या मोबाईलमधून तब्बल ३०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले असून, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Read moreएटीएम कार्ड बदलून नागरिकांना गंडवणारा सराईत गुन्हेगार रत्नागिरीत जेरबंद
रत्नागिरी शहर पोलिसांनी एटीएम कार्ड बदलून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, या कारवाईत त्याच्याकडून विविध बँकांची तब्बल ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत.
Read moreएटीएम कार्ड बदलून रत्नागिरीत महिलेची ५७ हजारांची फसवणूक; सुरतच्या भामट्याविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरीत एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने एका ५८ वर्षीय महिलेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून ५७ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत सुरत येथील एका भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read moreपोलिसांच्या ‘मिशन जलद’चा फुगा फुटला?
“हजारो अर्ज आणि शून्य प्रलंबित” असा दावा करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांची कार्यक्षमता संशयाच्या भोऱ्यात! उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या सायबर तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिसांचा दावा फोल ठरल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
Read moreऑनलाईन फसवणुकीत आरबीआय देणार २५ हजारांपर्यंत भरपाई; नवे नियम लागू
डिजिटल बँकिंग व्यवहारात ग्राहकाच्या चुकीमुळे ऑनलाईन फसवणूक झाली तरीही आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नव्या नियमांनुसार २५,००० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. १ जानेवारी २०२७ पासून लागू होणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयांतर्गत पुराव्याची संपूर्ण जबाबदारी बँकांवर असेल आणि ग्राहकांना फसवणुकीनंतर ५ दिवसांच्या आत तक्रार नोंदवणे बंधनकारक राहील.
Read moreमोठी कारवाई! ऑनलाईन बँकिंगद्वारे पावणेपाच लाखांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रत्नागिरी पोलिसांनी दोघांना मुंबईतून ठोकल्या बेड्या
रत्नागिरीतील साखरी बौद्धवाडी येथील ४ लाख ८२ हजार रुपयांच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना मुंबईतील दहिसर येथून अटक केली आहे.
Read more










