नंदुरबारमध्ये अल्पवयीनांच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश; २२ वर्षीय तरुणाकडून ३०० हून अधिक व्हिडिओ जप्त

नंदुरबार :
अल्पवयीन मुले आणि तरुणांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला नंदुरबार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चेतन प्रकाश कोळी (वय २२, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) असे या नराधमाचे नाव असून, त्याच्या मोबाईलमधून तब्बल ३०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे जप्त करण्यात आली आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
​जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी २०२२ पासून अल्पवयीन मुलांना पैशांचे आमिष दाखवून आणि त्यांच्याशी सलगी वाढवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच, या कृत्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितांना ब्लॅकमेल करत असे. ६ ऑगस्ट रोजी संशयित आरोपी भोणे फाटा परिसरात एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
​फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत मोबाईलची तपासणी केली असता एका ‘गुप्त फोल्डर’मध्ये हे सर्व डिजिटल पुरावे सापडले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो (POCSO) आणि बाल न्याय अधिनियमांतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून इतर पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Related Posts

कोल्हापूरमध्ये सावकारीचा जाच: ६ लाखांच्या कर्जापोटी उकळले अडीच कोटी, २ वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये खाजगी सावकारांची मुजोरी आणि अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिला अभियंत्याने (इंजिनिअर) ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याच्या बदल्यात तिने सावकाराला तब्बल…

Read more

‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहीम : ७२६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट

नवी मुंबई : ‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले सुमारे २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे ७२६ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई बुधवारी दुपारी तळोजा…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Betti slots registration steps – quick sign‑up guide for UK players

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti UK Security Guide – Licensing, Player Protection & Safe Play

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti withdrawal: what to know

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Betti Casino UK Review – Bonuses, Payments, Mobile App & Security Overview

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

Roletto legit? UK review of licensing, verification, bonuses & payments

  • By admin
  • October 4, 2026
  • 2 views

How to Register on the 1Win Argentina App – Step-by-Step Guide

  • By admin
  • October 4, 2026
  • 3 views
error: Content is protected !!