ठाकरांच्या सभेनंतर २४ तासांत यवतमाळ शिवसेनेत भूकंप; १५ प्रमुख पदाधिकारियोंचे सामूहिक राजीनामे
यवतमाळमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला २४ तास उलटण्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. खासदार संजय देशमुख यांचे खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या यवतमाळ तालुका प्रमुखांसह तब्बल १५ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिल्यामुळे जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
Read moreबाळू पूर्णेकर हत्याकांडात मोठे खुलासे! गोळीबार करणारा नीलेश पवार; संशयित ‘लावण्य’ची एसआयटीकडून चौकशी








