मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर दगड कोसळले, वाहतूक बंद

मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान मोठे दगड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. २७ जून रोजी होणाऱ्या ३५३ व्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; तोपर्यंत शिवभक्तांनी या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read more

error: Content is protected !!