रत्नागिरीत अवैध दारूविक्री विरोधात मद्य परवानाधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण
जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध आणि बनावट दारू विक्रीविरोधात मद्य परवानाधारकांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र ताशेरे ओढण्यात आले आहेत. “कर भरणारे रस्त्यावर आणि अवैध धंदेवाले मोकाट” असा सवाल करत, जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
Read more

