डॉक्टर मारहाण प्रकरण: शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विरोधकांच्या दबावानंतर विष्णू नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Read moreचिपळूण कामथे उपजिल्हा रुग्णालय हलगर्जीपणा प्रकरण: डॉ. कांचन मदार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणाच्या चौकशीप्रकरणी डॉ. कांचन मदार यांना अधिक तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रशासकीय त्रुटी आणि कारभाराची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
Read moreसुरज झोरे हत्याकांड: मुख्य आरोपीची मैत्रीण पोलिसांसमोर हजर, तपासाला वेग
रत्नागिरीतील खळबळजनक सुरज झोरे हत्याकांडात एक मोठी घडामोड समोर आली असून, या गुन्ह्याची मुख्य प्रत्यक्षदर्शी आणि संशयित आरोपीची मैत्रीण अखेर मुंबईतून पोलिसांसमोर हजर झाली आहे. पोलिसांनी तिला थेट घटनास्थळी नेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जुना आर्थिक वाद आणि मैत्रिणीला भडकवल्याच्या रागातून हा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
Read moreपुणे: दैवी शक्तीचा बहाणा करून अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्यला कोठडी; ‘धार्मिक शेंडी’ न कापण्याचे न्यायालयाचे आदेश
दैवी शक्तीचा बनाव करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्यला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून, कोठडीत असताना त्याची ‘धार्मिक शेंडी’ कापली जाऊ नये, असा आगळावेगळा आदेशही दिला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पुण्यात पुन्हा एकदा भोंदूगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Read moreधक्कादायक! ‘मुलीला शरीरसुखासाठी पाठव, १० हजार देतो’; अकोल्यात कोठडीतील महिलेकडे ASI ची मागणी, नराधम पोलीस अखेर निलंबित
अकोल्यात खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे तिच्या मुलीची शरीरसुखासाठी मागणी करणाऱ्या एएसआय राजेश जाधवला निलंबित करण्यात आले असून, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Read more





