40 कोटींचा विकासाचा दिखावा वाऱ्याने उडाला; ‘न्याती’ने सजवलेले रत्नागिरी रेल्वेस्थाकाचे छप्पर दुसऱ्यांना भुईसपाट
‘अमृत भारत स्टेशन योजने’अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ४० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचा निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘न्याती’ कंत्राटदार कंपनीने केलेले रेल्वे स्थानकाचे छप्पर सोमवारी मध्यरात्री पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. उद्घाटनापूर्वीही अशीच घटना घडली असताना, प्रशासनाने केवळ मलमपट्टी करून प्रवाशांच्या जिवाशी खेळ मांडल्याचा आरोप होत आहे. कोकणातील वादळी वारे आणि तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करून केलेल्या या भ्रष्ट व निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Read more






