मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात: नातूनगर धरणाजवळ झायलोची उभ्या एलपीजी टँकरला धडक; महिला ठार, दोन लहान मुलांसह तिघे गंभीर जखमी!
मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर धरणाजवळ झायलो कार उभ्या असलेल्या एलपीजी टँकरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात ३३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन लहान मुलांसह तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Read more

