चिपळूण नागरी सह. पतसंस्थेविरोधात पुन्हा एकदा उपोषणास्त्र!

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक अनियमितता आणि राजकीय दबावाविरोधात ४ मे पासून विकास हादवे आणि अकबर शिकलकर आमरण उपोषणाला बसणार आहेत. चौकशीतील अडथळे, सभासदांवरील हल्ले आणि लोकशाही मार्गाने चाललेल्या लढाईमुळे कोकणातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

Read more

पत्रकार दीपक भागवत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध; उद्या चिपळूणमध्ये राधाई फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली ‘मूक मोर्चा’

चिपळूणमध्ये दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी उद्या, ४ एप्रिल रोजी राधाई फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली ‘मूक मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. बहादूर शेख नाका ते चिपळूण पोलीस स्टेशन दरम्यान निघणाऱ्या या शांततापूर्ण आंदोलनात विविध संघटना आणि जागरूक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read more

रत्नागिरी: पत्रकार दीपक भागवत यांच्यावरील हल्ला निंदनीय; जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले कारवाईचे आश्वासन

चिपळूणमध्ये पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याची रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी गंभीर दखल घेतली आहे. ‘पाच भारतरत्नांच्या या जिल्ह्यात पत्रकारांवरील हल्ला निंदनीय असून, अशा घटनांना अजिबात थारा दिला जाणार नाही’, असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Read more

चिपळूण पत्रकार हल्ला प्रकरण: ५ दिवस उलटले तरी आरोपी मोकाट; संतापलेल्या पत्रकारांचा आंदोलनाचा इशारा

चिपळूणमध्ये पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याला ५ दिवस झाले तरी आरोपी अद्याप मोकाट आहेत. पोलिसांच्या दिरंगाईविरोधात पत्रकारांनी आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Read more

लोकशाहीची हत्या! चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गुंडांकडून पत्रकारावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला

चिपळूणमध्ये लोकशाहीला काळिमा फासणारी घटना! चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या गुंडांनी पत्रकार दीपक भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मारहाण करून त्यांची मोबाईल आणि ‘साईड बॅग’ हिसकावून घेत भररस्त्यात गुंडगिरी करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट असून दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

Read more

error: Content is protected !!