महिला खासदारांशी अरेरावी: तृणमूल खासदार कल्याण बनर्जी संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महिला खासदारांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना अधिवेशनापुरते लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
Read moreअभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर पहाटे पोलिसांचा छापा, ४ तासांच्या झडतीने बंगालमध्ये राजकीय भूकंप
टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी पोलिसांनी पहाटे ३ वाजता अचानक छापा टाकत ४ तास झाडाझडती घेतली. विविध घोटाळ्यांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या बॅनर्जी यांच्यावरील या कारवाईमुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसी आणि भाजपमध्ये मोठा राजकीय वाद पेटला आहे.
Read moreविरोधी पक्षांना फोडून भाजप देशात लोकशाहीचा गळा घोटतोय; आप नेते संजय सिंह यांचा घणाघाती आरोप
तृणमूल काँग्रेसमधील संभाव्य फुटीच्या चर्चांवरून ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी भाजपवर ‘लोकशाहीचा गळा घोटल्याचा’ तीव्र आरोप केला आहे. विरोधी पक्ष फोडण्याच्या भाजपच्या रणनीतीवर टीका करताना, “आता भाजपमध्ये जाण्यासाठी फक्त दाऊद इब्राहिमच उरला आहे,” असा टोला त्यांनी लगावला असून, जनतेने आवाज उठवला नाही तर भविष्यात निवडणुकांना काहीच अर्थ उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Read moreटीएमसीमध्ये उभी फूट! तीव्र विरोधानंतरही ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; अभिषेक बॅनर्जी पुन्हा राष्ट्रीय सरचिटणीसपदी
पश्चिम बंगालमधील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप झाला आहे. पक्षांतर्गत तीव्र विरोध आणि ५८ आमदारांच्या बंडखोरीला न जुमानता ममता बॅनर्जी यांनी आपले पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे, तर स्वतः अध्यक्षपद राखले आहे.
Read moreनिवडणुकीतील पराभवामुळेच ममता बॅनर्जींनी कोर्टात धाव घेतली; सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींची टिप्पणी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मतदार यादीतून नावे वगळल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी “निवडणुकीत पराभव झाल्यामुळेच ममता बॅनर्जींनी कोर्टात धाव घेतली” अशी टिप्पणी केली असून, न्यायालयाने टीएमसीला संबंधित उमेदवारांमार्फत वैयक्तिक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read moreविमानातील घोषणाबाजीने महुआ मोईत्रा आक्रमक; इंडिगो एअरलाईन्सकडे केली ‘या’ कारवाईची मागणी
विमानात झालेल्या घोषणाबाजी आणि गैरवर्तनाप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी इंडिगो एअरलाईन्सकडे तक्रार केली आहे. हा जाणीवपूर्वक केलेला मानसिक छळ असून दोषी प्रवाशांना ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Read moreसुवेंदू अधिकारींच्या पीएची भररस्त्यात हत्या; पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर रक्तरंजित हिंसाचार
पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराचा हा भाग असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Read moreनिवडणुकीत पराभवानंतरही ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार; ‘हे तर लोकशाहीचे नव्हे, कटकारस्थानाचे निकाल’
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवूनही ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. हा निकाल म्हणजे जनतेचा कौल नसून निवडणूक आयोगाने भाजपसाठी केलेले कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मतमोजणीत गैरव्यवहार झाल्याचा दावा करत त्यांनी याविरोधात लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली असून, राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या चौकशीसाठी १० सदस्यीय समितीही जाहीर केली आहे.
Read moreममता बॅनर्जींचा भाजपवर खळबळजनक आरोप; “मला लाथा मारल्या, CCTV बंद करून जनादेश लुटला”
पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली असून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले असून, मतमोजणी केंद्रावर आपल्याला लाथा मारण्यात आल्या आणि सीसीटीव्ही बंद करून जनादेश लुटला गेल्याचा दावा केला आहे. स्वतःच्या भवानीपूर मतदारसंघातूनही ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का बसला आहे.
Read moreभवानीपूर पोटनिवडणुकीत ‘बनावट बोटां’चा वापर? शुभेंदु अधिकारींच्या आरोपाने खळबळ
पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर मतदानासाठी चीनमधून ७५० बनावट बोटे मागवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. एकाच मतदाराकडून अनेकवेळा मतदान करण्यासाठी ही शक्कल लढवली गेल्याचा दावा त्यांनी केला असून, टीएमसीने हे आरोप ‘हास्यास्पद’ ठरवत फेटाळून लावले आहेत. या आरोपामुळे बंगालच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Read more










